MB NEWS-द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल,लिटिल स्टार इंग्लिश स्कूल व राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चे आज वार्षिक स्नेहसंमेलन

द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल,लिटिल स्टार इंग्लिश स्कूल व राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चे आज वार्षिक स्नेहसंमेलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...... परळीच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली शाळा म्हणून परिचित असलेल्या मदर टेरेसा सेवाभावी संस्थेच्या द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल, लिटल स्टार इंग्लिश स्कूल आणि राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल या शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज दि.२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक राजनाळे सर हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, बीड जिल्हा आरटीई प्रमुख गौतम चोपडे, राष्ट्रमाता जिजाऊ...