पोस्ट्स

MB NEWS:शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार

इमेज
  27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने परळीत कार्यक्रमाचे आयोजन-  रानबा गायकवाड     शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार परळी प्रतिनिधी.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी व परळी सिने नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने परळीत दिनांक 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जेष्ठ पत्रकार व नाटककार रानबा गायकवाड यांनी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत शेख गणी यांना याच कार्यक्रमात नाट्य पोषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.    दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.म.  नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव ( भैय्या) धर्माधिकारी हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी श्रीनाथ कलावंत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे परळी सचिव प्रा. डॉ. विनोद जगतकर तसेच नाट्य कलावंत संघटन...

MB NEWS:परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, एक तरुण ठार एक गंभीर जखमी.

इमेज
 ------------- परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, एक तरुण ठार एक गंभीर जखमी -------------- परळी वैजनाथ, दि.24,  येथील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर मोटारसायकल व रिक्षाच्या धडकेत एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (दि.25) सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणाची माहिती अशी की, परळी तालुक्यातील डाबी येथील संपत्ती पारवे व निकम इंगळे हे दोन तरुण मोटारसायकलवरुन थर्मल परिसरातील संभाजीचौकातून उड्डाणपुल मार्गे परळी शहरात येत होते. पुलावर त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगात येणार्‍या अ‍ॅटोरिक्षाने पाठीमागून  जोराची धडक दिली. यामुळे संपत्ती पारवे (वय 26, रा.डाबी) हा तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाल्याचे दिसले. जखमेतून रस्त्यावर दूरपर्यंत रक्तस्त्राव पसरला होता. त्याचा जोडीदार निकम इंगळे  हा ही या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

MB NEWS:डॉ राठोड, डॉ शेप, डॉ चाटे यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

इमेज
  डॉ राठोड, डॉ शेप, डॉ चाटे यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड  परळी प्रतिनिधी- जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.रमेश राठोड, इतिहास विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब शेप , मराठी विभागातील डॉ.रामेश्वर चाटे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या समाजशास्त्र, इतिहास व मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर, डॉ प्रमोद येवले यांनी नुकतीच निवड केली. त्याबद्दल वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य, डॉ जे व्हि जगतकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यापरिषद सदस्य ,डॉ. पी एल कराड, अधिसभा सदस्य,डॉ मुंजाभाऊ धोंडगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा हरिष मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ.राठोड ,डॉ. शेप, डॉ.चाटे यांचे अभिनंदन केले आहे

MB NEWS:वीरशैव समाजाचा सामुहिक विवाह सोहळा: रविवारी महत्वपूर्ण बैठक

इमेज
  वीरशैव समाजाचा  सामुहिक विवाह सोहळा: रविवारी महत्वपूर्ण बैठक परळी वैजनाथ/प्रतिनिधी वीरशैव समाजातील सर्व पोटजाती यांचा भव्य सामुहिक विवाह सोहळा परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येणार असून या संदर्भात वीरशैव बांधव-भगिनींची महत्वपूर्ण बैठक रविवार दि.26 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता संतश्री गुरूलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी वीरशैव समाजातील सर्व पोटजातींचा भव्य सामुहिक विवाह सोहळा परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात उद्या रविवारी संतश्री गुरूलिंगस्वामी मंदिर (बेलवाडी) येथे सकाळी 10 वा. महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक दत्ताप्पा इटके गुरूजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस वीरशैव समाजातील महिला, पुरूष यांनी मोठया संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन वीरशैव समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे.         Video news 

MB NEWS:चैत्री वारी: श्री.संत जगमित्रनागा महाराज पायी दिंडी व पालखीचे प्रस्थान

इमेज
चैत्री वारी: श्री.संत जगमित्रनागा महाराज पायी दिंडी व पालखीचे प्रस्थान परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)        गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली श्री संत जगमित्रनागा यांच्या पालखीचे गुढी पाडव्याच्या दिवशी श्री संत जगमित्रनागा मंदिरातून प्रस्थान केले.      प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी वर्षप्रतिपदा गुढीपाढवा बुधवारी (ता.२२) संत श्री. जगमित्र नागा महाराज यांचे चैत्रमास पंढरपुर वारी साठी हजारो भाविकांच्या उपस्थित दुपारी ३ वाजता पंढरपुर पायी वारीस प्रस्थान झाले. पायी पालखी दिंडीचा मार्ग परळी ते गिरवली पहिला मुक्काम, गिरवली, आकोली, ते गादवड, पळशी, उस्मानाबाद ते उंडेगाव, मोहीते वस्ती, अंजनगांव,रामनवमीला (ता.३०) मुक्कामी असेल. तर सोमवार (ता.०३) एप्रिल दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होतो.१४ एप्रिल ला परत श्री संत जगमित्रनागा मंदिरात येणार आहे. Video news 

MB NEWS:भिमवाडी येथील बौद्ध विहारात गौतम बुद्धांचा अस्थिकलश दाखल; उपासकांनी घेतले दर्शन

इमेज
  भिमवाडी येथील बौद्ध विहारात गौतम बुद्धांचा अस्थिकलश दाखल; उपासकांनी घेतले दर्शन परळी प्रतिनिधी -  जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय  तथागत भगवान गौतम बुद्ध यांचाअस्थिकलश शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी तीन वाजता भिम वाडी येथील बौद्ध विहारात दाखल झाला होता. लातूर येथील धम्म परिषदेसाठी अस्थी कलश रवाना होण्यापूर्वी भीमवाडी येथे बौद्ध उपासकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.      शहरातील भीमवाडी मित्र मंडळाच्या विनंतीला मान देऊन लातूर येथील धम्म परिषदेसाठी जाणारा तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थीकलश भीमवाडी येथील बौद्ध विहारात  उपासक   उपासिकांच्या दर्शनासाठी आज दिनांक 24 रोजी सकाळी 12वा. ठेवण्यात आला होता.         या  आस्थिकलशाचे भीमवाडी येथे असंख्य उपासक, उपासिका,बालक,बालिकांनी दर्शन घेतले. Video news 

MB NEWS:प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात ………. लाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. गेवराई.. गेवराई.खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी अमित नाना तरवरे (वय ३२ रा. नाईकनगर तांडा, गेवराई) या तलाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी गेवराईत करण्यात आली. अमित तरवरे हा गेवराई तालुक्यातील दैठण सज्जाचा तलाठी आहे. परंतू त्याच्याकडे तलवाडा सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. याच भागातील एका व्यक्तीच्या खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तरवरे याने तीन हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने बीड एसीबीकडे तक्रार केली. त्याप्रमाणे शुक्रवारी सापळा लावण्यात आला. त्यानंतर पंचासमक्ष तीन हजार रूपये घेताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे,  उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळ...