इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

 प्लॉटची फेरफार नोंद ऑनलाईन करण्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात



……….

लाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

गेवराई..


गेवराई.खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी अमित नाना तरवरे (वय ३२ रा. नाईकनगर तांडा, गेवराई) या तलाठ्याला तीन हजार रूपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी गेवराईत करण्यात आली.


अमित तरवरे हा गेवराई तालुक्यातील दैठण सज्जाचा तलाठी आहे. परंतू त्याच्याकडे तलवाडा सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. याच भागातील एका व्यक्तीच्या खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तरवरे याने तीन हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने बीड एसीबीकडे तक्रार केली. त्याप्रमाणे शुक्रवारी सापळा लावण्यात आला. त्यानंतर पंचासमक्ष तीन हजार रूपये घेताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे,

 उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी आदींनी केली.





Video news 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या