MB NEWS:वीरशैव समाजाचा सामुहिक विवाह सोहळा: रविवारी महत्वपूर्ण बैठक

 वीरशैव समाजाचा  सामुहिक विवाह सोहळा: रविवारी महत्वपूर्ण बैठक




परळी वैजनाथ/प्रतिनिधी

वीरशैव समाजातील सर्व पोटजाती यांचा भव्य सामुहिक विवाह सोहळा परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येणार असून या संदर्भात वीरशैव बांधव-भगिनींची महत्वपूर्ण बैठक रविवार दि.26 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता संतश्री गुरूलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी वीरशैव समाजातील सर्व पोटजातींचा भव्य सामुहिक विवाह सोहळा परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात उद्या रविवारी संतश्री गुरूलिंगस्वामी मंदिर (बेलवाडी) येथे सकाळी 10 वा. महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक दत्ताप्पा इटके गुरूजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्यासह समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस वीरशैव समाजातील महिला, पुरूष यांनी मोठया संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन वीरशैव समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

       Video news 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार