MB NEWS:परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, एक तरुण ठार एक गंभीर जखमी.

 -------------

परळीत रेल्वे उ्डाणपुलावर अपघात, एक तरुण ठार एक गंभीर जखमी



--------------

परळी वैजनाथ, दि.24, 

येथील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर मोटारसायकल व रिक्षाच्या धडकेत एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (दि.25) सायंकाळी ही घटना घडली.

या प्रकरणाची माहिती अशी की, परळी तालुक्यातील डाबी येथील संपत्ती पारवे व निकम इंगळे हे दोन तरुण मोटारसायकलवरुन थर्मल परिसरातील संभाजीचौकातून उड्डाणपुल मार्गे परळी शहरात येत होते. पुलावर त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगात येणार्‍या अ‍ॅटोरिक्षाने पाठीमागून  जोराची धडक दिली. यामुळे संपत्ती पारवे (वय 26, रा.डाबी) हा तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाल्याचे दिसले. जखमेतून रस्त्यावर दूरपर्यंत रक्तस्त्राव पसरला होता. त्याचा जोडीदार निकम इंगळे  हा ही या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !