इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार

 27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने परळीत कार्यक्रमाचे आयोजन-  रानबा गायकवाड

    शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार

परळी प्रतिनिधी.  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी व परळी सिने नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने परळीत दिनांक 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जेष्ठ पत्रकार व नाटककार रानबा गायकवाड यांनी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत शेख गणी यांना याच कार्यक्रमात नाट्य पोषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

   दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.म.  नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव ( भैय्या) धर्माधिकारी हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी श्रीनाथ कलावंत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे परळी सचिव प्रा. डॉ. विनोद जगतकर तसेच नाट्य कलावंत संघटनेचे सचिव तसेच प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे तसेच लेखक दिग्दर्शक, नाटककार ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड तसेच या कार्यक्रमास नाट्य क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

         याच कार्यक्रमात परळी तालुक्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या नाट्य कलावंतास नाट्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच जुन्या आणि नवीन नाट्य कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी शहर व तालुक्यातील सिने आणि नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांनी तसेच नाट्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रानबा गायकवाड यांनी केले आहे.

   शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार

     शहरातील ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते शेख गणी  यांना याच कार्यक्रमात नाट्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शेख गणी यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. याबरोबरच नाट्य क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी व परळी सिने  नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट