MB NEWS:श्री हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

श्री हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात परळी वैजनाथ श्री हनुमान व्यायाम शाळेत आज हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. जुन्या गाव भागातील अंबेवेस येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या श्री हनुमान व्यायाम शाळेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवार दि 6 एप्रिल रोजी सकाळी 6.14 मिनिटांनी नरसिंग देशमुख यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. व्यायाम शाळेच्या स्थापनेपासून हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. श्री हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी यावेळी बलोपासेनेचे महत्व सांगत तरुणांनी दैनंदिन व्यायाम न कंटाळता करावा व भौतिक वस्तूवर लक्ष देण्याऐवजी आपल्या अमूल्य शरीरावर लक्ष देण्याचे आवाहन केले. Click: *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* यावेळी नारायणदेव गोपनपाळे, खके गुरुजी, डाबीकर सर, महादेवआप्पा फडकरी य...