MB NEWS:१८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल

 पोलिसांनी केले मोटार सायकल चोरांचे रॅकेट उघड; १८ मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात

पाच आरोपी ताब्यात तर मुख्य आरोपी फरार


१८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल


केज प्रतिनिधी :- केज पोलिसांनी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार सायकली चोरून त्याची विल्हेवाट लावनारे आणि सुट्टे भाग दुसऱ्या गाड्याना वापणारे एक मोठे रॅकेट ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून १८ मोटारसायकली व मोटार वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीने संगनमत करून चोरीच्या वाहनाचे स्पेअर पार्ट वेगवेगळे करून मोटार सायकलला बसवुन तसेच लिलावा व्दारे घेतलेल्या मोटार सायकलचे सामान करारनामा करून देवुन देखील लोकसेवकाने घालुन दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लघंन करून स्क्रॅप इंजिन इतर मोटार सायकलला बसवुन, विक्री करून, लिलावा मधील घेतलेले मोटार सायकलचे सर्व सामान विकी साठी अप्रमाणीकपणे ठेवुन फसवणुक केलेली आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

Click:*परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*


या बाबतची माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना अशी माहिती मिळाली की, केज तालुक्यातील बनकरंजा येथील गणेश रामेश्वर गिरी हा चोरीतील मोटार सायकलीचे सुट्टे भाग व इंजिन स्वस्तात गाड्यांना बसवून देत आहे ही माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी पोलीस पथकाला तपासाचे आदेश दिले. आदेश मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, दिलीप गित्ते, त्रिंबक सोपणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस जमादार बालाजी ढाकणे, अनिल मंदे आणि सचिन अहंकारे यांनी सापळा रचून गणेश रामेश्वर गिरी याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सांगितले की, तो चंद्रकांत केदारलिंग घोंगडे यांने चोरून आणलेल्या गाड्यांचे सुट्टेभाग हे स्वस्तात ईत्तर गाड्याना बसवून देत होता. तसेच बीड येथील भंगार दुकानदाराने लिलावात घेतलेल्या मोटार सायकलींचे सुट्टेभाग हे नष्ट न करता अप्रमानिकपणे विक्री करून ते मोटार सायकलीना वापरले असल्याचे निष्पन्न झाले. 


या वरून पोलिसांनी रामेश्वर गिरी, मोमीन कौसर, तन्वीर कादरखॉन पठाण, जानीमीयॉ गफुर शेख, शेख अस्लम मुस्तफा या पाच जणांना ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव यांच्या फिर्यादी वरून बालासाहेब पाडुरंग शिंदे, अशोक अर्जुन शिंदे, सतीश कुडंलिक शिंदे, संतोष भानुदास पारवे, आजमेर इब्राहीम शेख, सखाराम भागवान पारवे, हनुमंत बळीराम शिंदे, पंडित वैजिनाथ शिंदे, शेख ईशाद अब्दुल, राहुल शिंदे, बापू शिंदे, आश्रुबा मधुकर सिरसाट, तन्वीर कादरखॉन पठाण, जानीमीयॉ गफुर शेख, शेख अस्लम मुस्तफा, अस्लम मुस्तफा, मोमीन कौसर मोमीन बाबामियॉ चंद्रकांत केदारलिंग घोगंडे आणि ​​गणेश रामेश्वर गिरी यांच्या विरुद्ध गु. र. नं. १२१/२०२३ भा. दं. वि. १८८, ३७९, २०१, ४११, ४१८, ४२० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


------------------------------------------------


मुख्य आरोपी फरार ! :- मोटार सायकल चोरीच्या रॅकेट मधील मुख्य आरोपी चंद्रकांत घोंगडे हा फरार असून त्याला ताब्यात घेतल्या नंतर जिल्हा आणि जिल्ह्या बाहेरील मोटार सायकल चोरीचे कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.


------------------------------------------------


पाच आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी :- या चोरी प्रकरणात पंकज कुमावत यांच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींना न्यायालयाने ६ एप्रिल पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Click:● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

---------------------------------------------------








Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार