MB NEWS:शंख, तुतारी, डमरु, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात परळीत श्री हनुमान श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात
शंख, तुतारी, डमरु, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात परळीत श्री हनुमान श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात
परळी वैजनाथ (संतोष जुजगर).....
शंख, तुतारी, डमरु, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात परळी वैजनाथ शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. फुलांनी सजविलेली आकर्षक आरास, जन्मकाळ सोहळा हनुमान स्त्रोत अशा भक्तिपूर्ण वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी मोठ्या भक्ती पूर्ण व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी भाविकांनी जय श्रीराम , बजरंग बली की जय असा जयघोष केला.
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त परळी वैजनाथ शहरातील विविध श्री हनुमान मंदिरात रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने मंदिरे सजली होती. दुपारनंतर झालेल्या महाप्रसाद वाटपाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
परळी वैजनाथ येथील श्री वेताळ मंदिर, श्री हरिहर तीर्थावरील मारुती मंदिर, पांढरीचा मळा येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, माणिकनगर भागातील श्री हनुमान मंदिर, कल्याणकारी हनुमान मंदिर, वन मारुती, बाजीप्रभू नगर येथील श्री हनुमान मंदिर, मोंढा भागातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली. भाविकांनी श्री हनुमंताला रुईचा हार, पंचामृत आणि तेल वाहिले. विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
------------------------------------------------
● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._
Click:*परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*
---------------------------------------------------
Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू
Video news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा