MB NEWS:सोनार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संघटकपदी परळीतील सुरेश टाक यांची निवड ; परळीत मित्र मंडळीकडून सत्कार

 सोनार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संघटकपदी परळीतील सुरेश टाक यांची निवड ; परळीत मित्र मंडळीकडून सत्कार



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व  क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व, परळीचे माजी उपनगराध्यक्ष. सुरेशराव सखाराम टाक यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या राज्य संघटकपदी निवड झाली आहे.त्याबद्दल प्रेम भक्ती साधना केंद्रात व मित्र मंडळीच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यानिवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


Click:*परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*


             परळी वैजनाथ येथील लाड सोनार समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व,परळीचे मा.उपनगराध्यक्ष सुरेशराव सखाराम टाक यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या राज्य महासंघटक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणीक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांच्या नावाची शिफारस परिसरातील अनेक समाजबाधंवानी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष मा.श्री.मधुकरराव मैड यांचेकडे केली होती.संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून संघटनेचे प्रमुख सूत्रधार मा.श्री.गोविंददादा अंबिलवादे यांच्याकडे सुरेशराव सखाराम टाक यांच्या निवडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर त्यांची निवड जाहीर करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या व समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या पुढील समाजीक  वाटचालीस शुभेच्छा व अभिनंदन होत आहे. यानिवडीबद्दल बुधवार दि.०५ एप्रिल रोजी परळी वैजनाथ क्षेत्रातील   सुवर्णकार समाजाचे सामाजिक परळी भुषण पुरस्कार सन्मानित, व मा. उपनगराध्यक्ष , व प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी,  राहणारे, सर्वांचे आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले,  सामजिक राजकीय क्षेत्रातील दबंग नेते, गुरुदास सेवा आश्रम येथे वयोवृद्ध  लोकांची  सेवा करणारे,  वरील  सर्व  सामजिक राजकीय क्षेत्रातील कार्य करण्याची धडपड, व त्यां कार्याची पावती दखल घेऊन सुरेश अण्णा टाक यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार  संघटनेच्या राज्य महा संघटक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांबद्दल प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे व मित्र मंडळीच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. यावेळी   सामजिक कार्यकर्ते रमेश मुंडलिक,सचिन भांडे, धिरज जगले, बालाजी ढगे, महादेव गित्ते, दीपक सूफले, वैजेनाथ घोटकर,  काशिनाथ शहाणे, गोविंद दहीवाळ, वैजेनाथ  बोकन,दिलीप बुरांडे, सतिष टेहरे,  संतोष दहिवाळ, उमकांत टाक,  शेखर टेहरे, गवते मामा, सर्व मित्र मंडळ परिवार, व सुवर्ण कार समाज बांधव  ,  सर्व पत्रकार मित्र मंडळ,  सर्व पदाअधिकारी, समाज बांधव यांच्या उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन भांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश मुंडलिक धारासूरकर यांनी केले.


● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

---------------------------------------------------








Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?