MB NEWS:अंजनवतीच्या श्री संत तुकाविप्र संस्थानमध्ये चोरी ; चोरट्यांच्या माराने दोन महिला गंभीर जखमी.

अंजनवतीच्या श्री संत तुकाविप्र संस्थानमध्ये चोरी ; चोरट्यांच्या माराने दोन महिला गंभीर जखमी नेकनुर... बीड तालुक्यातील मौजे . अंजनवती येथील येडे वस्ती स्थित श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात आज 26 एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला . प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांना मारहाण केली . त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . नेकनूर पोलिस घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखा व श्वानपथक यांनी पाहणी केली . घरात झोपलेले पुजारी कृष्णा जोशी यांच्या रूमला बाहेरून कडी लावली त्याचवेळी शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या कृष्णा जोशी यांच्या पत्नी गीता जोशी ( वय ४५ ) यांच्या डोक्यात मारहाण केली . डोळ्याखाली जखम असुन सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे डोक्याला मारहाण केली त्यांच्यावर बीड येथील फिनिक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत . दीड तोळे सोने व काही रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे . नेकनुर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेख मुस्तफा , पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव , हवालदार...