MB NEWS:रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी

परळी तालुक्यातील चौपदरीकरणाच्या कामात शेकडो वर्षपूर्वीच्या मोठमोठ्या वृक्षांची तोड रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी - म.न.से. व संभाजी ब्रिगेडची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी तालुक्यातील अनेक रस्त्यांचे चौपदरीकरण होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी शेकडो वर्ष वय असलेल्या मोठमोठ्या वृक्षांची तोड होत आहे. त्या बदल्यात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. परळी - बीड, परळी - अंबाजोगाई, धर्मापुरी - परळी, परळी - गंगाखेड, परळी - सोनपेठ या रोडचे रुंदीकरनाचे काम सध्या सुरु असून या रोडवर शेकडो वर्षाचे खूप मोठे मोठे वृक्ष होते ती वृक्ष रस्त्याच्या कामासाठी तोडण्यात येत आहेत. विकास कामे करताना अशा काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु या कारणाने नैसर्गिक गोष्टींची हानी होते आहे. हि होत असलेली हानी भरून काढण्यासाठी पण पाऊल उचलणे गरजेचे आहे. अगोदरच थर्मल पावर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, शेकडो विटभट्या यामुळे परळीकरांना उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. त्यातच शेकडो वर्षाची महाकाय वृक्...