अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...