एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

किशोरवयीन मुलींना नियमितपणे पूरक पोषण आहार देण्याची व्यवस्था करा - मागणी सशक्त आंगणवाडी निरोगी समाज अभियानाअंतर्गत मागणी एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन परळी :राज्यात कुपोषण ( Malnutrition )आणि रक्ताची कमतरता ( Anemia )ही गंभीर समस्या आहे . मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर या जन अधिकारासाठी कार्यरत सामाजिक संघटनेतर्फे राज्यव्यापी अभियान सशक्त अंगणवाडी निरोगी समाज राबविण्यात आले . या अभियानांतर्गत निष्कर्षात आलेल्या दोन मागण्या मुख्यमंत्री यांना करण्यात आल्या . महिला व बालकांना आवश्यक आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षण सेवा पुरविणारे आंगनवाड्या हे एक महत्वाचे सार्वजनिक केन्द्र म्हणून काम करते हे सर्वज्ञात आहे परंतु आपल्या राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे नाहीत , ही खेदाची बाब आहे. पुरेशा संख्येने अंगणवाडी केंद्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक त्याच्या लाभापासून वंचित राहतात या व्यतिरिक्त महाराष्ट्रात मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली कुपोषण आणि एनिमियाच्या बळी पडल्या आहेत, ज्यांना अंगणवाडीव्दारे पूरक पोषण आहार देण्याची तरतूद आहे...