पोस्ट्स

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इमेज
  जि प प्रा शा संगम येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  परळी तालुक्यातील मौजे संगम येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.      स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापक अशोक नावंदे सर  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अच्युतराव चव्हाण गोरे,उपसरपंच कामाळे ,सर्व सदस्य ग्रा पं संगम,शा व्य समिती अध्यक्ष नवनाथराव नागरगोजे, शिक्षक श्री महादेव गित्ते सर ,सुभाष कोंकेवाड सर,श्रीम. कल्पना बडे मॅडम, श्रीम. बबिता शिंदे मॅडम,श्री ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने जि प प्रा शा संगम शाळेमध्ये मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ, बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा तसेच निपुण भारत प्रतिज्ञा आझादी का अमृत महोत्सव व विविध विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य या विषयावर आपले विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली शोभा वाढवली.यावेळी श्री प्रमोद(लक्की ) नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीची वाटप करण्यात आ...

स्वातंत्र्य दिन

इमेज
  परचुंडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.      स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सरपंच सौ. मीना गुरुलिंगआप्पा नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक श्री दशरथ गोरे,उपसरपंच बाळासाहेब थोरात ,मा. उपसरपंच वैजेनाथ पत्रवाळे मुख्याध्यापक  लक्ष्मण आजले सर ,शिक्षक श्री निलेवार सचिन सर व ग्रा. प. सदस्य ओम पत्रवाळे, माऊली नावंदे, फोटोग्राफर गणेश पत्रावळे  यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने जि प प्रा शा परचुंडी शाळेमध्ये मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ, बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा तसेच निपुण भारत प्रतिज्ञा आझादी का अमृत महोत्सव व विविध विद्यार्थ्यांनी भाषण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गावातील महिला तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण

इमेज
  नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.         शहरातील नगर परिषद कार्यालय येथे "भारतीय स्वातंत्र्य दिन " सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी  मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या शुभहस्ते पवित्र अशा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदचे मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याकार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी,  दतात्रय ढवळे, राजेंद्र सोनी, वैजनाथ बागवाले, रविमूळे, बद्दरभाई, सौ. अन्नपूर्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. नगर परिषदेचे  कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे सह नगर परिषदचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी नागरिक उप...

वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राचार्य ,डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन  परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाची प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पासून या दिवसाला  ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारताला मुक्त करण्यासाठी आनेक शूरवीरांनी प्राणाची आहुती दिली व भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. तेव्हा पासून आपण हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत आहोत. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव आप्पा मुंडे, उपाध्यक्ष टी.पी .मुंडे, संस्थेचे सचिव दत्ताप्पा इटके यांच्यासह इतर संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयन कुमार आचार्य यांनी केले.तसेच रसायनशास्त्र विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठा...

मुर्तीची प्राणप्रतिष्ठा

इमेज
  ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचे हस्ते किनगावकर झाली राधाकृष्ण' मुर्तीची प्राणप्रतिष्ठा   किनगाव (प्रतिनिधी)   संतवाङ्मयाचे संशोधक तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या पवित्र हस्ते 'श्रीराधाकृष्ण'मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा  दिनांक १५आँगस्ट रोजी संपन्न झाला.              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री बाबासाहेब पाटील, तर प्रमुख पाहुणे विनायकराव पाटील माजी मंत्री . श्री.प्रविण फुलारी साहेब उपजिल्हाधिकारी अहमदपूर,श्री बब्रुवानजी खंदाडे माजी आमदार, डॉ.हरिश्चंद्र वंगे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक, डॉ.दे.घ.मुंडे विचारवंत,सौ.स्मिता देशमुख गीतावाचक, डॉ.अमोल पागे कृष्णभक्त, तुकाराम फड महाराज हिंगणगाव,ॲड. अनिलराव नवटके अध्यक्ष वकील संघ अहमदपूर,डॉ.दे.घ.मुंडे विचारवंत आदिंच्या उपस्थित हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी सामुदायिक गीतापाठ व सुप्रसिद्ध गायिका गानकोकिळा गोदावरीताई मुंडे यांचे गायनाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, कार्यक्रमाचे  संयोजक ॲड. सुनील रामराव केंद्रे, श्री अ...

हुतात्मा स्मारक कोनशिलेचे भूमिपूजन

इमेज
  प्रा.डॉ.बळीराम पांडे यांचा तिरुका ग्रामस्थानी केला सन्मान मराठवाडा (प्रतिनिधी...)तिरुका येथील  भूमिपुत्र तथा देवगिरी महाविद्यालयातील  अर्थशास्त्र विभागाचे  अभ्यासु प्राध्यापक  डॉ. बळीराम पांडे यांचा सन्मान तिरूका ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.                     प्रा.डॉ.बळीराम पांडे यांना ध्वजारोहण करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले होते.याप्रसंगी डॉ.पांडे यांना मायेची, विश्वासाची शाल पांघरण्यात आली. अन् कित्येक वर्षाच्या त्यांच्या हरवलेल्या आनंदाश्रूंना त्यांना आवरता आले नाही.आत्यंतिक भावस्पर्शी असा हा कार्यक्रम संपन्न झाला.स्वातंत्र्य सेनानी संग्राम आत्माराम पांडे यांचा कर्तृत्ववान, समाजशील नातू म्हणून हा सन्मान त्यांना देण्यात आला.यावेळी स्वातंत्र्य सेनानी संग्राम आत्माराम  पांडे आणि त्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील  सहकारी यांच्या स्मृती जपण्यासाठी तिरुका ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारक कोनशीलेचे भूमिपूजनही प्रा.डॉ.बळीराम पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

स्वातंत्र्य दिन उत्साहात

इमेज
  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ग्रामपंचायत कासारवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय कासारवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे तसेच उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सर्व गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी घेतली. बालविवाहास कोणीही प्रोत्साहन देणार नाही अथवा मदत करणार नाही असे गावकऱ्यांनी आश्वासन दिले.  त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विविध महात्म्यांची तसेच स्वातंत्र्यासाठी मेहनत घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची भूमिका घेणारे विद्यार्थी शोभून दिसत होते. ढोल, ताशा, हलगी यांच्या गजरामध्ये विद्यार्थी बालविवाहाच्या आणि भारत मातेच्या घोषणा देत होते. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थांचाही मोठा...