पोस्ट्स

राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने, आरक्षण मिळावे यासाठी सर्व मिळून व्यापक प्रयत्न करू - धनंजय मुंडे

इमेज
  धनंजय मुंडे यांनी परळीतील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास दिली भेट राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने, आरक्षण मिळावे यासाठी सर्व मिळून व्यापक प्रयत्न करू - धनंजय मुंडे जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेत जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होणारच - मुंडेंचा आंदोलकांना शब्द परळी वैद्यनाथ (दि. 4) - मागील राज्य सरकारच्या काळात आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात संवैधानिक बाबींमध्ये निर्माण झालेल्या पेचामुळे टिकू शकला नाही, मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच विचारांचे हे सरकार आहे; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून व्यापक प्रयत्न करू, सरकारही सरकारची जबाबदारी 100% पार पाडेल, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली - सराटी येथे मराठा क्रांती मोर्चा आंदोलन स्थळी झालेल्या अप्रिय घटनेनंतर परळी वैद्यनाथ येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनास आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. जाल...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

इमेज
  मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे- अभयकुमार ठक्कर परळी / प्रतिनिधी  मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर यांनी यावेळी आंदोलन कर्ते शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे व राष्ट्रवादी तालुका प्रमुख लुगडे महाराज  यांना जाहीर पाठिंबा दिला असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असेही ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले.       मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी येथील तहसील कार्यालया समोर मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी शनिवारी (ता २) बेमुदत ठिय्या सुरुवात झाली आहे. ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता.4) शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभय कुमार ठक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी  आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलन कर...

पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा गाडीही रद्द

इमेज
  पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा गाडीही रद्द  परळी रेल्वे स्थानकावरून धावणारी महत्वाची रेल्वे गाडी असलेली पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा ही रेल्वेमार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामानिमित्त रद्द करण्यात आलेली आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग अंतर्गत चालणाऱ्या अनेक गाड्या रद्द व अंशतः रद्द करण्यात आलेल्या असून त्यात रेल्वेस महसुली उत्पन्न देणारी पूर्णा-हैदराबाद डेक्कन-पुर्णा हे रेल्वे गाडी काही दिवस रद्द करण्यात आलेली असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार पूर्णा- हैदराबाद-पूर्णा एक्स्प्रेस गाडी रोलिंग ब्लॉक कामामुळे काही दिवस रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 17648 पूर्णा – हैदराबाद एक्स्प्रेस दि 05 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर, 2023 तर गाडी क्रमांक 17647 हैदराबाद –  पूर्णा एक्स्प्रेस दिनांक 06 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर, 2023   दरम्यान रद्द करण्यात आली  आहे.

जनता जनार्नदाचे हे प्रेम असेच अबाधित राहो हिच इच्छा

इमेज
 श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने प्रचंड उत्साहात सुरू झाली पंकजा मुंडेंची शिव-शक्ती परिक्रमा कार्यकर्त्यांकडून जागोजागी जंगी स्वागत ; आबालवृद्ध, महिला स्वागतासाठी रस्त्यावर; सुवासिनींनी केले औक्षण अन् फुलांचा वर्षाव परिक्रमेला निघतांना  छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबांना केले वंदन जनता जनार्नदाचे हे प्रेम असेच  अबाधित राहो हिच इच्छा छत्रपती संभाजीनगर ।दिनांक ०४।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या शिव-शक्ती परिक्रमेला सुरूवात केली. कार्यकर्त्यांनी  प्रचंड आणि सळसळता उत्साहाने यावेळी त्यांचे जागोजागी जंगी स्वागत केले. आबालवृद्ध, महिला त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरल्या, ठिकठिकाणी फुलांचा वर्षांत करत सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं.      पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा आजपासून सुरू झाली. सकाळी त्यांनी वेरूळ येथे श्री घृष्णेश्वरास विधिवत पूजा, अर्चना करून  दर्शन घेतले. पावसा अभावी महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्...
इमेज
साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा आपघाती मृत्यू   बीड- प्रथितयश साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नी दिली आहे. कर्जत येथे नोकरीस असलेले बीड येथील रहिवासी प्रा श्रावण गिरी हे सायंकाळी औरंगाबाद वरून आले होते.कर्जत ला जाण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते.तेथून ट्रॅव्हल्स ने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना या ट्रॅव्हल्स ने त्यांना धडक दिली,त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधी  सोमवारी त्यांच्या मूळगावी लिंबगाव ता. अंबाजोगाई येथे ठीक सकाळी 10 वाजता होईल. 💐💐 *भावपूर्ण श्रद्धांजली*💐💐

'शिव-शक्ती' परिक्रमेची सुरूवात

इमेज
  पंकजा मुंडे यांच्या 'शिव-शक्ती' परिक्रमेची श्री  घृष्णेश्वरच्या दर्शनाने होणार सुरूवात स्वागतासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी ; परिक्रमा १२ जिल्हयात जाणार - टिझर झाला प्रचंड व्हायरल परळी वैजनाथ ।दिनांक ०३।  शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची परिक्रमा उद्यापासून (ता. ४) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने सुरू होत आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा  प्रवास परिक्रमेचा असणार आहे.  या परिक्रमेचा  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गांवोगावी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी होत आहे.   उद्या सोमवारी सकाळी ८ वा. पंकजाताई मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ७ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील पांडूरंग काॅलनी गारखेडा परिसरात संत भगवान बाबा मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील. दरम्यान परिक्रमेचा टिझर आज प्रचंड व्हायरल झाला. पराक्रम खूप केले, आता परिक्रमा करू असं सांगत पंकजाताई मुंडे यांनी श...

'संस्कृत दिन'

इमेज
  वैद्यनाथ महाविद्यालयात 'संस्कृत दिन' साजरा               *परळी वैजनाथ-दि.३*                      सर्व भाषांची जननी व समग्र ज्ञान- विज्ञानाचे आगर म्हणून ओळख असलेल्या संस्कृत या प्राचीन भाषेत वैश्विक कल्याणाचे  विश्वाचे मूलभूत वैभव दडले असून या भाषेच्या अभ्यासाने मानवी जीवन धन्य होते, असे विचार प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक आचार्य श्री सानंद यांनी मांडले.         येथील वैद्यनाथ महाविद्यालयात नुकताच *संस्कृत दिन* साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ आर. डी. राठोड यांनी भूषविले. यावेळी उपप्राचार्य एच.डी. मुंडे ,पर्यवेक्षिका प्रा.सौ. मंगला पेकमवार ,समन्वयक प्रा.यु. आर. कांदे उपस्थित होते. याप्रसंगी आचार्य श्री सानंद यांनी संस्कृत भाषेतील चिरंतन गुणवैशिष्ट्यांचा गौरव करून ही भाषा शिकण्यास अतिशय सोपी, सुलभ, शुद्ध, रंजक,गोड, रसपूर्ण व उच्च ज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले- 'प्राचीन ऋषी-मुनी व साहित्यिकांनी  संस्कृत भाषेतून साहित्य सृजन क...