शेतकऱ्यांप्रति शासन संवेदनशील - कृषिमंत्री

● कृषी प्रश्नावर किसान सभा व कृषी मंत्री यांच्यात सखोल चर्चा शेतकऱ्यांप्रति शासन संवेदनशील - कृषिमंत्री परळी / प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवून त्यांना तातडीने दिलासा देण्यासंदर्भात किसान सभेच्या शिष्ट मंडळाने राज्याचे कृषी मंत्री यांची भेट घेत विविध मागण्यांसाठी सखोल चर्चा केली यावेळी कृषिमंत्री यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून लवकरच प्रश्न निकाली काढू असे आश्वासित केले. अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आपणास निवेदन करण्यात येते की, सन 2020 च्या पिक विमा पासून ते मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापर्यंत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यात भर म्हणून की काय यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम पुरता हातचा गेलेला आहे तर रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती लागेल याची सूतराम शक्यता नाही. पावसा अभावी जिल्ह्यातील पीक परिस्थितीच नाही तर एकंदर पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंत सर्वच स्थिती बिकट आहे. उत्तरोत्तर परिस्थिती आणखी दाहक होत जाणार आहे. म्हणून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अशा स्थित...