पोस्ट्स

शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यास उपस्थित रहा- अनिल अष्टेकर

इमेज
शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यास उपस्थित रहा- अनिल अष्टेकर परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....            शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा 28 वा राज्यव्यापी मेळावा व श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधीची शासकीय महापूजा उद्या 26 नोंहेबर दुपारी 4.00 वाजता तीर्थक्षेत्र कपिलधार जि.बीड येथे बीड जिल्हाचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे , शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे,माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, जिल्हाधिकारी, माजी मंत्री चंद्रकांत खैरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार ,सरचिटणीस उमाकांत अप्पा शेटे, तसेच गुरूवर्य, शिवाचार्य, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यास कृषी मंत्री ना.धनंजपय मुंडे, शिक्षण मंञी दिपक केसरकर,माजी मंत्री अतुल सावे व संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर व शिवाचार्य मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यात शिवा संघटनेच्या वतीने अहमदपुरकर मढाचे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना वयाच्या 14 व्या वर्षी युव...

पनौती,क्रिकेट,वैयक्तिक टीका यापेक्षाही संभाव्य पाणीटंचाई, दुष्काळ,महागाई हे मुद्दे इले.मीडियाने मांडावेत - सेवकराम जाधव

इमेज
पनौती,क्रिकेट,वैयक्तिक टीका यापेक्षाही संभाव्य पाणीटंचाई, दुष्काळ,महागाई  हे मुद्दे इले.मीडियाने मांडावेत - सेवकराम जाधव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) क्रिकेट हा खेळ आहे  कोण हरेल कोण जिंकेल. कोणी कुठे जाऊन जुगार खेळायचा न खेळायचा, कोण हरलं, पनौती कोण ठरलं, कोणत्या देशात जाऊन कोणी आणि किती सट्टा लावला..? या गोष्टी रात्रंदिवस चघळत बसून इले.मीडियाला काय साध्य करायचे असेल बरं..?  यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याकारणाने दुष्काळाचे संकट वाढले असून शेतकरी आत्महत्या करत आहेत. पुढील पावसाळ्यासाठी सहा महिने बाकी आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी एक इंचही पाणी पातळी वाढलेली नसून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. हिवाळ्यामध्येच  बोर आणि विहिरीचे पाणी आटत आहे. छोटे मोठे तलाव अर्धवट भरली नाहीत.येणाऱ्या काळात पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात बचत करावी लागणार आहे. या सर्व कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. याबद्दल जर इले.मीडिया वाले बोलले तर दंड पडेल का..? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी उपस्थित केला आहे.

वै.ह.भ.प रामेश्वर महाराज गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजन

इमेज
  परळीत पाच दिवशीय कथा -किर्तन महोत्सवास प्रारंभ: झी टॉकिज 'मनमंदिर' वर होणार प्रसारण          परळीवैजनाथ: तालुक्यातील नंदनज येथील वै.ह.भ.प रामेश्वर महाराज गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ गुट्टे परिवार आयोजित येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर मध्ये  झी टॉकिज प्रस्तुत  कथा -किर्तन महोत्सवामध्ये  ह.भ.प. अनुराधा दिदि शेटे यांचा गजर किर्तनाचा कार्यक्रम(12 ज्योतिर्लिंग  कथा) दि. 25 नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे.विमा विकास आधिकारी ओमकेश दहीफळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व   अनुराधा दिदीचे स्वागत करण्यात आले.यावेळी सो.क्ष.कासार समाजाचे अध्यक्ष संजय वानरे,परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  अरुण गुट्टे,भारत महाराज गुट्टे ,अमोल महाराज गुट्टे, ओमकेश दहीफळे   सौ.शुभांगी वानरे ,सौ .गीता वानरे  व  संजय खाकरे  व्यासपीठावर  उपस्थित होते.                      दिं.२५  ते दि. 29 नोव्हेंबर, 2023 या...

बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा: वयाच्या चौथ्या वर्षी हाती बॅट घेतलेल्या सचिनने मिळवले यश

इमेज
  बीडच्या सचिन धस याची 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड बीड  : ज्या वयात मुले खेळण्याशी खेळत असतात त्या वयात हाती बॅट घेणाऱ्या बीडच्या सचिन धस यांनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. आशिया कप साठी त्याची 19 वर्षाखालील संघात निवड झाली असून बीडकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. सचिन धस बीड येथील आदर्श क्रिकेट ॲकॅडमी चा खेळाडू असून त्याच्या खेळातील सातत्य पाहून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याला 14 वर्षाखालील संघात स्थान दिले तेव्हापासून सचिन मागे वळून पाहिले नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या खेळातील सातत्य पाहून आता 19 वर्षाखालील भारतीय संघात त्याची निवड झाली असून या संधीचेही तो नक्कीच सोने करील अशी आशा त्याच्या प्रशिक्षकांनी तसेच पालकांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांच्या निवेदनाची घेतली दखल

इमेज
  कार्तिक पोर्णिमेनिमित्त कपीलधार जाण्याकरिता रा.प.बीड विभागाकडून 75 जादा बसेस ची सोय सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांच्या निवेदनाची घेतली दखल परळी वैजनाथ/प्रतिनिधी श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी - वैजनाथ सह जिल्हयातील विविध ठिकाणाहून 75 जादा बसेस चे नियोजन दि.25 नोव्हें ते दि.27 नोव्हें दरम्यान भाविक-भक्तांसाठी श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीदर्शन व यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र कपीलधार जाणा-या व येणा-या भाविक-भक्तांसाठी केले आहे. अधिक(जादा) बसेसची सोय करण्याची मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळी अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने राज्य परीवहन परळी आगारप्रमुख श्री.संतोष महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती याची दखल राज्य परीवहन विभाग,बीड यांनी घेऊन जादा बसेस नियोजना संदर्भातील लेखी पत्र चेतन सौंदळे यांना दिले आहे. लेखी पत्रात परळी-वैजनाथ येथून 18,अंबाजोगाई-11 बीड-10,धारूर10,  माजलगांव07,गेवराई 07,पाटोदा 07,आष्टी05,अशा एकूण 75 जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे नमुद केले आहे. कार्तिक पोर्णि...

6 डिसेंबर ला परळी तालुक्यातील 93 पोलीस पाटील सोडत

इमेज
  परळी वैजनाथ तहसील कार्यालयात पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत  बीड (जिमाका)  बीड जिल्हृयातील सर्व उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द कार्यक्रम जाहीर झाला असून कालबध्द कार्यक्रमाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ उपविभागातील संबंधित गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर करावयाचे आहे. परळी वैजनाथ उपविभागातील परळी वैजनाथ तालुक्यातील 93 पोलीस पाटील यांचे पदे रिक्त असून ज्या गावातील पदे रिक्त आहेत ते विचारात घेवुन लोकसंख्येच्या टक्केवारी आधारे प्रवर्ग निहाय आरक्षण व त्यामधून 30 टक्के महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सदर प्रवर्ग निहाय आरक्षण दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 1.00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, परळी वैजनाथ येथे काढण्याचे निश्चित केले असून पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावातील नागरीकांनी आरक्षण सोडतीस उपस्थित राहता येईल, असे परळी वैजनाथचे उपविभागीय कार्यालयाचे, उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

‘अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’ आणि बार्टीपुणे यांचे सयुक्त विद्यमाने मेळावा उत्साहात

इमेज
 ‘अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’ आणि बार्टीपुणे यांचे सयुक्त विद्यमाने मेळावा उत्साहात  बीड (जि. मा. का.)   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) आणि साहित्यरत्न लोकशाहीर मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग,मांग गारुडी,मांग गारोडी आणि मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळपर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता योजनांचा प्रचार, प्रसार व जास्तीत जास्त लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा लातुर व जिल्हा बीड येथील  मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवासाठी गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, शिवनेरी गेट समोर,डाल्डा फॅक्टरी कंपाऊंड,लातुर येथे मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात शाहीर  एन.बी कसबे  यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाणे सादर केले. मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिष सांगळे व्यवस्थापकीय संचालक, साहित्यरत...