युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

6 डिसेंबर ला परळी तालुक्यातील 93 पोलीस पाटील सोडत

 परळी वैजनाथ तहसील कार्यालयात पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत 



बीड (जिमाका) 

बीड जिल्हृयातील सर्व उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द कार्यक्रम जाहीर झाला असून कालबध्द कार्यक्रमाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ उपविभागातील संबंधित गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर करावयाचे आहे.

परळी वैजनाथ उपविभागातील परळी वैजनाथ तालुक्यातील 93 पोलीस पाटील यांचे पदे रिक्त असून ज्या गावातील पदे रिक्त आहेत ते विचारात घेवुन लोकसंख्येच्या टक्केवारी आधारे प्रवर्ग निहाय आरक्षण व त्यामधून 30 टक्के महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सदर प्रवर्ग निहाय आरक्षण दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 1.00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, परळी वैजनाथ येथे काढण्याचे निश्चित केले असून पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावातील नागरीकांनी आरक्षण सोडतीस उपस्थित राहता येईल, असे परळी वैजनाथचे उपविभागीय कार्यालयाचे, उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या