पोस्ट्स

सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर

इमेज
  सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांना राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार 2023 जाहीर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या 23 व्या पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठेचा 2023 राज्यस्तरीय वीरशैव रत्न पुरस्कार परळी वैजनाथ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री. चेतन अरविंद सौंदळे सर यांना जाहीर झाला असून  रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सोनपेठ येथे एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सोनपेठ येथे रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या वितरण सोहळ्यास अनेक गुरूवर्य शिवाचार्य महाराज तसेच विशेष उपस्थिती म्हणून परभणी जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,सोनपेठ चे तहसीलदार श्री.सुनील कावरखे,मुख्याधिकारी कोमल सावरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुनील अंधारे,महाराष्ट्र वीरशैव महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी,वैजनाथ देवल कमिटीचे विश्वस्त जेष्ठ नेते विजयकुमार मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे हे राहणार आहेत.  या कार्यक्रमा...

भेल स्कूल मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
भेल स्कूलमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे   जयंतीनिमित्त शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद   लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती प्रतीवर्षी उत्साहात विविध उपक्रमाने सर्वदूर साजरी होत असते. याही वर्षी परळी शहरातील नामांकित व सर्वात जुनी असणारी भेल सेकंडरी स्कूल, या विद्यालयात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याची सुरुवात आज विद्यालय अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेऊन करण्यात आली. इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी "ग्लोबल वॉर्मिंग " व 9वी ते 10वी या गटासाठी "संघर्षयोद्धा" हे विषय ठेवले होते.  वरील विषयांवर विद्यार्थ्यांनी तयारी करून,आपला प्रभावी सहभाग या स्पर्धेसाठी नोंदवून- आपला ठसा उमटवला.या स्पर्धेमध्ये एकूण 50 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण, 12 डिसेंबर म्हणजेच साहेबांच्या जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते जाहीर होईल. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्यालयातील अनुभवी व उत्कृष्ट शिक्षक श्रीमान जयंत अयाचित सर व उत्कृष्ट सहशिक्षिका सौ, सुमेधा कुलकर्णी मॅडम यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे नियोजन कलोपासक...

जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी

इमेज
  जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी   बीड, 8: (जीमाका) जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी.   जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन  आदरांजली वाहण्यात आली.   याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रभारी गौण खनिज अधिकारी महादेव काळे, नायब तहसीलदार टाक, शिवशंकर मुंडे,राम घडशे,गोटुराम गोरेल, आदी कर्मचारी उपस्थित होते.

परळी मतदारसंघास 380 कोटी

इमेज
  हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून बीड जिल्ह्याला हजारावर कोटींचा निधी! पालकमंत्री धनंजय मुंडेंची कोटी-कोटींची उड्डाणे! सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना व पुलाच्या कामांवर निधीचा वर्षाव परळी मतदारसंघास 380 कोटी अनेक प्रशासकीय इमारतींचे काम लागणार मार्गी परळी वैद्यनाथ (दि.08) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा ध्यास घेतला असून, यासाठी केवळ घोषणा करून, बोलून मोकळे न होता, धनंजय मुंडे यांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांना निधी मिळवून, बोललेला शब्द खरा करून दाखवला आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील विविध प्रशासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने, महत्वाचे रस्ते व पूल, शासकीय रुग्णालये, त्यातील सुविधांचा विकास आदी अनेक कामांसाठी एक हजार कोटी पेक्षा अधिक निधीस हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  या बद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता

इमेज
  स्वाराती रुग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग होणार सुपर स्पेशालिटी दर्जाचा! वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली सव्वा दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता नांदेडच्या घटनेनंतर आ. नमिता मुंदडांनी केलेल्या मागणीला यश अंबाजोगाई - एमबी न्युज वृत्तसेवा  नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बालकांच्या मृत्युच्या दुर्दैवी घटनेनंतर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुसज्ज असावे जेणेकरून रुग्णांच्या जीवितास धोका होणार नाही यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटीच्या दर्जाची व्हावीत अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह सुपर स्पेशालिटी प्रमाणे करण्यासाठी (मोड्युलर ओटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया गृहातून होणारा जंतुसंसर्ग कमी होऊन रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळणार आहे. या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध केल्याबद्दल केज मतदार संघातील जनता आ. मुंदडा यांचे आभार ...

अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून

इमेज
  अंबाजोगाईत दिवसाढवळ्या दगडाने ठेचून तरुणाचा खून अंबाजोगाई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जवळ मोंढा रोडवर एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी (दि.०८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.  राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि लाकडी दांड्याने राजेंद्र यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात राजेंद्र यांचा जागेवर मृत्यू झाला. भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रोडवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून यामागे जागेच्या वादाचे कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ••••••••••••••••••••••••

जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान

इमेज
  जेष्ठ विधिज्ञ अश्विनीकुमार उपाध्याय यांचे जाहीर व्याख्यान  परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दिल्ली येथील राजनीति व प्रशासनाचे गाढे अभ्यासक सुप्रसिद्ध जनहित याचिकाकर्ता  सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ विधिज्ञ  अश्विनी कुमार उपाध्याय यांचे आज रोजी वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. '' भारतीय राजनीति व प्रशासन यात अमुलाग्र बदलाची आवश्यकता'' एक संवाद असा विषय घेण्यात आलेला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री बाजीराव भैया धर्माधिकारी हे असून माननीय राजेश देशमुख यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन होणार आहे, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा, भास्कर मामा चाटे सामाजिक कार्यकर्ते, विनोद  सामत चेअरमन वैद्यनाथ बँक , रवी सानप पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन,  जुगलकिशोर लोहिया माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ, जेष्ठ विधिज्ञ वैजनाथ नागरगोजे, जेष्ठ विधिज्ञ राजेश्वर देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.      तरी अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानासाठी आपण ऊपस्थिती रहावे असे आवाहन प्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे दादा,  दंत रोग तज्ञ ड...