पोस्ट्स

सामाजीक कार्यकर्त्या सौ.चंद्रकला कोल्हे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित

इमेज
 सौ.चंद्रकला कोल्हे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित परळी (प्रतिनिधी)  प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाउन कुटुंबाला सावरण्याबरोबरच सामाजीक, धार्मिक व पतीच्या व्यावसायीक क्षेत्रात मोलाचे कार्य करणार्या परळी येथील शिवम शॉपी च्या संचालिका सौ.चंद्रकला वैजनाथअप्पा  कोल्हे यांना राजामाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.   अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शुक्रवारी (ता.12) संगम येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व समाजकार्यात सक्रिय सहभाग असणार्‍या महिलांचा कार्यक्रमास व्यासपीठावर श्री क्षेत्र केदारनाथ उत्तराखंड येथील महामंडलेश्वर  साध्वी सुश्री श्री वैष्णवी देवश्री दुर्गा, विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरणकुमार गित्ते,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.शालिनीताई कराड, परभणी जि.प.च्या माजी अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, माजी सरपंच सौ.वच्छलाताई कोकाटे, चेतना गौरशेटे, राधिका जायभाये, रमाताई आलदे, अ.भा. वारकरी भजनी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीत व्यंकटेश शिंदे यांचा बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश

इमेज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीत व्यंकटेश शिंदे यांचा बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत काल बीड जिल्ह्यातील उ बा ठा गटातील नेते व्यंकटेश शिंदे यांनी बीड मधील आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.        बीड जिल्हातील ठाकरे गटाला उतरती कळा लागली असून सुषमा अंधारेेंवर  आरोप करत  बंड पुकरणाऱ्या व्यंकटेश शिंदे यांच्या समर्थनार्थ  शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.  राज्याचे  मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे  यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दि. १२ जानेवारी रात्री उशिरा व्यंकटेश शिंदे यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्या सह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बीड लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, अनिल  जगताप, परळी विधानसभा प्रमुख भाऊसाहेब मोरे, शिवसेना शहरप्रमुख वैजनाथ माने उपस्थित होते. उ बा ठा नेते व्यंकटेश शिंदे यांच्या सह माजी ...

मॅरेथॉनमध्ये खा. डाॅ. प्रितम मुंडे होणार सहभागी

इमेज
  नमो चषक : परळीत उद्या मॅरेथॉन, व्हाॅलीबाॅल स्पर्धा  मॅरेथॉनमध्ये खा. डाॅ. प्रितम मुंडे होणार सहभागी   परळी वैजनाथ।दिनांक १३। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उद्या रविवारी नमो चषक २०२४ अंतर्गत मॅरेथॉन व व्हाॅलीबाॅल स्पर्धा होणार आहेत. मॅरेथॉनमध्ये खासदार डॉ.प्रितमताई मुंडे स्वतः सहभागी होऊन स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करणार आहेत. दरम्यान या दोन्ही स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून नाव नोंदणी मोठया प्रमाणात झाली आहे.   भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो चषक अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न होत असून एक वेगळाच अनुभव शहरातील स्पर्धक घेत आहेत. उद्या १४ जानेवारीला सकाळी ६.३० वा. पोलीस स्टेशन  येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात होणार आहे. ही स्पर्धा वय वर्षे १५ वर्षापुढील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला व मुली अशा तीन गटात असणार आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धेचा मार्ग नेहरू चौक, फाऊंडेशन स्कूल, दोस्ती टी हाऊस, पाॅवरलुम रस्ता, पोलीस स्टेशन हा आहे तर युवकांसाठी पोलीस स्टेशन, राणी लक्ष्मीबाई टॉवर, ...

_मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_

इमेज
  अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यान व धार्मिक उत्सव _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         येत्या २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असुन या पावनपर्वाच्या अनुषंगाने परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यान व धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'एक दिवस श्रीरामासाठी.. रामरक्षा देशासाठी' या न्यायाने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन श्री काळाराम संस्थानने केले आहे.        मित्ती पौष शु.१२ शके १९४५ सोमवार, दि. २२/ ०१/२०२४ रोजी  अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्यानिमित्त श्री काळाराम मंदिर संस्थान, स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, अंबेवेस, परळी वैजनाथ, जि.बीड. येथे 'एक दिवस श्रीरामासाठी.. रामरक्षा देशासाठी' या विषयावर सकाळी ११:०० वा. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. श्याम महाराज नेरकर (एम.ए., नेट., पी.एच.डी.) (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वै.) यांचे व्याख्यान होईल.दु...

नामविस्तार दिन :✍️प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष ब्लॉग >>>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार : लढा अस्मितेचा

इमेज
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार : लढा अस्मितेचा म हाराष्ट्रात राज्य स्थापन करणाऱ्या बहुतेक राजांनी आपल्या राजधान्या मराठवाड्यात किंवा त्याच्या आसपास स्थापन केल्या होत्या. अनेक संत विद्वानांच्या पदस्पर्शाने या मराठवाड्याचा प्रदेश पावन झाला आहे .महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक- सांस्कृतिक -राजकीय जडणघडणीत मराठवाड्याचे फार मोठे योगदान आहे .त्या अर्थाने मराठवाड्याचा इतिहास दैदिप्यमान आणि स्फूर्तीदायक मानला पाहिजे.  ऐतिहासिक दृष्ट्या मराठवाडा हे नाव फार जुने नाही इसवीसन १८६४ च्या कागदपत्रात या प्रदेशाला "मराठवाडी" असे संबोधलेले आढळते. मराठी शब्दकोशात उपरोक्त नोंद उद्धृत केलेली आहे .डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या मते," मराठवाडा हे प्रादेशिक नाव असून त्याचा अर्थ मराठी बोलांचा भूप्रदेश असा होतो." पूर्वीच्या हैदराबाद राज्यात बहुभाषिक भूप्रदेशाचा समावेश होत होता. त्या भागांना त्यांच्या बोलीभाषे वरून ओळखले जात होते. त्यावरून मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न भाषिक भूप्रदेश साकार झाले .वास्तविक या प्रदेशाच्या परिसीमा इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात निश्चित...

प्रभू श्रीराम, राजमाता जिजाऊंच्या आकर्षक व सुबक रांगोळ्यांनी उपस्थितांचे वेधले लक्ष!

इमेज
नमो चषक ; रांगोळी, संगीत खुर्ची, रस्सीखेच स्पर्धेला परळीत महिलांचा  उत्स्फूर्त सहभाग प्रभू श्रीराम, राजमाता जिजाऊंच्या आकर्षक व सुबक रांगोळ्यांनी उपस्थितांचे वेधले लक्ष! परळी वैजनाथ ।दिनांक१२। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आज  भाजपच्या वतीने नमो चषक २०२४ अंतर्गत  पार पडलेल्या रांगोळी, संगीत खुर्ची आणि रस्सीखेच स्पर्धेत महिलांचा सळसळत्या उत्साहासह उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. प्रभू श्रीराम, राजमाता जिजाऊंच्या आकर्षक, सुबक व एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.     भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या वतीने  नमो चषक २०२४ अंतर्गत विविध स्पर्धांना आजपासून सुरवात झाली. जिल्हयात सर्वात प्रथम महिलांसाठीच्या रांगोळी स्पर्धेने याची सुरवात झाली. अक्षता मंगल कार्यालयात झालेल्या रांगोळी स्पर्धेला महिला व युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रभू श्रीराम, अयोध्येतील राममंदिर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आदी विषय यासाठी देण्यात आले होते, स्पर्धकांनी एकापेक्षा एक सुंदर व हुबेहुब रांगोळ्य...

_तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन_

इमेज
  आशा व गटप्रर्वतक यांचा बेमुदत संप :परळी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक सहभागी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप आज दिनांक 12 जानेवारीपासून सुरू झाला असून या बेमुदत संपात परळी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत. बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने या संपात सहभाग घेण्यात आला असून आज युनियनच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन बेमुदत संपावर जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.         महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांना मोबदला वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यात आशांना दरमहा रु.७०००/ -व गटप्रवर्तक यांना दरमहा रु.१०,०००/- अशी वाढ प्रस्तावित केलेली आहे. परंतू शासनाने संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार जी.आर. काढलेला नाही. त्यामुळे सीटु संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य कृतीसमीतीची बैठक संपन्न झाली त्यात  दि.१२ जानेवारी २०२४ पासुन आशा व गटप्रवर्तक यांचा बेमुदत संप पुकारण्याचा  निर्णय घेण्यात आला. त्याचाच भाग म्हणून परळी तालुक्यातील...