इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

_तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन_

 आशा व गटप्रर्वतक यांचा बेमुदत संप :परळी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक सहभागी




तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप आज दिनांक 12 जानेवारीपासून सुरू झाला असून या बेमुदत संपात परळी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत. बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने या संपात सहभाग घेण्यात आला असून आज युनियनच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन बेमुदत संपावर जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.


        महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांना मोबदला वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यात आशांना दरमहा रु.७०००/ -व गटप्रवर्तक यांना दरमहा रु.१०,०००/- अशी वाढ प्रस्तावित केलेली आहे. परंतू शासनाने संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार जी.आर. काढलेला नाही. त्यामुळे सीटु संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य कृतीसमीतीची बैठक संपन्न झाली त्यात  दि.१२ जानेवारी २०२४ पासुन आशा व गटप्रवर्तक यांचा बेमुदत संप पुकारण्याचा  निर्णय घेण्यात आला. त्याचाच भाग म्हणून परळी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक ह्यांनी आज दि.१२ जानेवारी २०२४ पासुन बेमुदत संपावर जात असल्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले.१. २०००/- दिवाळी बोनस त्वरीत खात्यावर जमा करण्यात यावा.२. गटप्रवर्तकांना घोषीत केलेली १०,०००/- वाढ तात्काळ देण्यात यावी. ३. आशा घोषीत केलेली ७,०००/- वाढ तात्काळ देण्यात यावी. आदी महत्वपूर्ण मागण्यासाठी हा बेमुदत संप करण्यात आला आहे. यावेळी बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे सर्व पदाधिकारी आशा वर्कर्स गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या