पोस्ट्स

गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

इमेज
  गुरुदत्त पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         इंद्रायणी प्रतिष्ठान संचलित जिजामाता विद्यालय धर्मापूरी येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक गुरुदत्त छगनबुवा पुरी यांना सेवानिवृत्ती निमित्त  निरोप देण्यात आला.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करदादा नागरगोजे,वीणा बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ दिलीपराव गित्ते,महाराष्ट्र भूषण, डॉ.धर्मवीर भारती,माजी प्राचार्य ईश्वर क्षीरसागर,ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणअण्णा फड श्री शंकर विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एल.गित्ते,नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बी.आर.चाटे,संत भगवान बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक ढगे,मुख्याध्यापक अविनाश शेटे,गोविंद सोनपिर,हनुमंत कराड,मोहन कांदे, विष्णू भताने, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. गित्ते सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.           गुरुदत्त पुरी यांनी या संस्थेमध्ये ३२ वर्षे प्रदीर्घ सेवा केली.यानिमित्त त्यांचा  सपत्...

lरोजगार निर्मितीसाठी मोठा उद्योग, कॅन्सर रुग्णांसाठी उपचार सुविधा, मेडिकल काॅलेज

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी अंबाजोगाईत व्यापारी बांधवांसमोर मांडली जिल्हयाच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' पालकमंत्री असताना जिल्हयासाठी खूप काम केलं ; लोकनेते मुंडे साहेबांचं विकासाचं अधुरं स्वप्न  पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या अंबाजोगाई ।दिनांक २९। लोकनेते मुंडे साहेबांनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते आपल्यातून अचानक निघून गेले आणि त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पालकमंत्री असतांना जिल्हयात  खूप काम केलं, आता पुन्हा एकदा ती संधी मिळण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असा एखादा मोठा उद्योग व्हावा, कॅन्सर रूग्णांना उपचाराची सुविधा मिळावी, चांगलं मेडिकल काॅलेज व्हावं अशी माझी इच्छा आहे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंटच व्यापारी बांधवांसमोर सादर केली.    पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी शहरातील व्यापारी बांधवांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्ह...

प्रथम वर्षश्राद्ध: विनम्र अभिवादन

इमेज
  कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्धा निमित्त ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......      येथील कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त शनिवार, दि.३०/०३/२०२४ रोजी ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.             शनिवार, दि.३०/०३/२०२४ रोजी कै. प्रयागबाई बळीराम शेळके यांच्या प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. रहाते घर न्यू शिवाजी नगर ता. परळी वैजनाथ, जि.बीड येथे त्यानिमित्त सकाळी १० ते १२ ह.भ.प. भरत महाराज गुट्टे ह.भ.प. प्रभावतीताई पाळवदे यांचे किर्तन होणार आहे. तरी किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन राजाराम बळीराम शेळके, रोहीत राजाराम शेळके, रोहन राजाराम शेळके यांनी केले आहे.

कचरा वेचणारे हात शिक्षणाचे धडे कधी गिरवतील?

इमेज
  कचरा वेचणारे हात शिक्षणाचे धडे  कधी गिरवतील? प्रत्येक शहरात आणि गावाच्या कोपऱ्याला भीक मागून आणि कचरा वेचून जीवन जगणारी मंडळी पाहायला मिळते.कुणीच शिक्षण (Education) घेतलेले नाही. त्यामुळे शिक्षणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. घरातील सदस्यांप्रमाणेच इथली लहान मुलं पण कचरा वेचून आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात.भीक मागून आणि कचरा वेचून जीवन जगणारी मंडळी पाहायला मिळते. अशावेळी काळीज पिळवटून जाते. इथली लहान लहान मुलंही कधी रस्त्यात, सिग्नलवर भीक मागताना दिसून येतात. त्यांच्या पिढ्यापिढ्या शिक्षणाचा संबंध आलेला नाही नाही, अशाच वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या कुठल्याही प्रकारची कागदपत्र नसल्याने त्यांचा शाळेतही प्रवेश होत नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच ते कचरा वेचायला जाणं आणि शहरभर फिरून भीक मागून जीवन जगणं हा त्यांचा नित्य नियम, मात्र घरात कोणी शिकलेला नसल्यामुळे शिक्षणाचही महत्व नाही.जे हात कचरा वेचण्यासाठी दिवसभर राबततात, ते हात  पाटी पेन्सिलवर शिक्षणाचे धडे  कधी गिरवतील? शहरीकरणामुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या निर्माण झाली आहे. कचरा व्यवस्थापन ह...

Loksabha Election Beed:पंकजाताई मुंडेंचा दौरा

इमेज
पंकजाताई मुंडेंचा उद्या माजलगाव दौरा; विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद परळी वैजनाथ, प्रतिनिधी           भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्य़ात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दि. 29 रोजी पंकजाताई मुंडे या माजलगाव शहरात असणार आहेत.या दौऱ्यात सिद्धेश्वर दर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी त्या घेणार आहे.त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत.           भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे या प्रथमच जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघनिहाय दौरा सुरु आहे.ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या  शुक्र वार, दि. 29 मार्च 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा माजलगाव दौरा आ...

विनम्र अभिवादन: कै.फुलचंद गित्ते (आबा)

इमेज
एम. कॉम. बीएड शिक्षण घेतल्यानंतरही मातीशी घट्ट नातं ठेवणारे शेतीनिष्ठ 'आबा': कै.फुलचंद गित्ते   का ही व्यक्तिमत्व असे असतात की ते या लोकात नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र सदैव जाग्याच राहतात अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे कै. फुलचंद गित्ते  हे होत. परळी तालुक्यातील मलकापूर या गावातील शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय संयमी, मितभाषी, सुस्वभावी असे व्यक्तिमत्व म्हणजे फुलचंद गित्ते होत. कै.फुलचंद गित्ते यांना परळी व पंचक्रोशीत सगळेजण सुस्वभावे म्हणून ओळखत होते. फुलचंद गित्ते यांचे निधन होऊन एक वर्ष कसे लोटले हे कळालेही नाही. आज जरी ते आपल्यात नसतील तरी त्यांच्या स्मृती मात्र सदैव आठवणीतच राहणार आहेत. गित्ते परिवार व त्यांचे स्नेही, नातेवाईक, मित्रपरिवार यांना सदैव त्यांच्या स्मृती आठवणीतच राहणार आहेत. Click : ■ मलकापूर येथे कै. फुलचंद गित्ते यांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमनिमित्त ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे किर्तन             परळी तालुक्यातील मलकापूर येथील एक कुटुंब वत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून...

परळीतील रानबा महाराज मंदिराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प; वैद्यनाथ भक्ती मंडळाला साहित्य प्रदान

इमेज
  जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीने सामाजिक बांधिलकी जोपासून शिवजयंती केली साजरी परळीतील रानबा महाराज मंदिराचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प; वैद्यनाथ भक्ती मंडळाला साहित्य प्रदान *छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले-माऊली फड* परळी वैजनाथ/प्रतिनिधी जगाच्या पाठीवर आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की ज्यांनी आपल्या राज्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांच्या प्रगती आणि सुरक्षेचा विचार केला आहे. छ.शिवाजी महाराज हे आदर्श राजे असून त्यांच्या सुराज्याचे विचार आजही तेवढेच अनुकलनीय असून राजांच्या सुराज्य धोरणावर जर आपण काम केले तर महाराष्ट्र नेहमीच जनतेचे राज्य म्हणून ओळखले जाईल असे मत विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड यांनी व्यक्त केले. परळी शहरातील मलिकपुरा, पंचायत समितीसमोरील संतश्री रानबा महाराज यांच्या मंदिराचे अपूर्ण काम गुढीपाडव्यापर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला.  वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे ...