पोस्ट्स

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारती पवार यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवा

इमेज
  पंकजा मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारती पवार यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवा दिंडोरी ।दिनांक १८। नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. गेल्या दहा वर्षांत देशाची त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल सुरू आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी डाॅ. भारती पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्याने संसदेत पाठवा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज जाहीर सभेत केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ.भारती प्रविण पवार यांच्या प्रचारार्थ आज  श्रीरंग लाॅन्स सोनगांव सायखेडा येथे आयोजित केलेल्या जाहिर सभेत त्या बोलत होत्या.    लोकनेते मुंडे साहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा मी पुढे घेऊन जात आहे, याबाबत कुणाचं दुमत असण्याचे कारण नाही कारण ते माझे केवळ माझे पिता नव्हते तर ते माझे नेते होते, त्यांनी जे संस्कार आम्हाला दिले आहेत त्यानुसार माझी वाटचाल सुरू आहे. आज भारतीताईंच्या मागे एक महिला म्हणून मी खंबीर...

२१ वर्षीय युवकाची आत्महत्या

इमेज
२१ वर्षीय युवकाची आत्महत्या केज :- केज तालुक्यातील बोरगाव येथे एका एककिविस वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.          याबाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. १७ मे रोजी केज तालुक्यातील बोरगाव येथे विवेक शांतीदास गालफाडे वय (२१ वर्ष) या अविवाहित युवकाने गायरानातील लिंबाच्या झाडाला दोराने गळफास घेवून आत्महत्या केली.         हा प्रकार हा शेतातील एकाने पाहिल्या नंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने पोलीस जमादार बाबासाहेब बांगर आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे हे घटना स्थळी रवाना झाले. त्यांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चिंचोली माळी येथे हलविले. रुग्णालयात प्रेताचे शविच्छेदन केल्या नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान विवेक गालफाडे याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत

इमेज
  कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत        बीड, दि. 17 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय बीड मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुंटुबाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी त्यांना रोजगार व स्वयं रोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरजूना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. बीड जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षांकरिता एकुण 500 प्रशिक्षणार्थींचे कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून  प्राप्त झालेले आहे. बीड जिल्हातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टल वरिल नोंदणी केलेली आहे. अशा प्रशिक्षण संस्थेने 31 मे 2024 पर्यत शासनाच्या नियमानूसार सर्व आवश्यक कागदपत्रासह दोन प्रतित प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक यांनी मान्यता दिलेली  आहे. अटी, शर्ती / निकषा नुसार प्रस्ताव सादर करावेत. तसेच खालील अटी, शर्ती / निकष लागु राहतील.   ...

शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये

इमेज
  शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये        बीड, दि. 17 (जिमाका):सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियत्रंणासाठी कापसाची लागवड ही अशा अवकाळी पावसावर करणे योग्य होणार नाही. कापसाची लागवड ही कोणत्याही परिस्थितीत 1 जून पुर्वी करण्यात येऊ नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.      1 जून पूर्वी लागवड केल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत होत नाही व अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे येणारे उत्पादन गुणवत्तेत कमी पडते तसेच पिक उत्पादनाचा खर्च अधिक येतो. अशा मालाला दरही कमी मिळतो त्यामुळे पूर्व हंगामी लागवड किफायतशीर राहत नाही. शेतक-यांनी 1 जून पूर्वी कापसाची लागवड करु नये.
इमेज
कु.शुभा गिरीश कुलकर्णीचे सुयश  परळी -   सीबीएसई   10 च्या    परीक्षेत  कु.शुभा गिरीश कुलकर्णी  पुण्याच्या (गोखले नगर ) विखे पाटील मेमोरियल स्कूल मध्ये   95.5% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.  विशेष बाब म्हणजे शालेय अभ्यासक्रमा सोबतच कथ्थक या नृत्य प्रकारात  आर्टिस्ट म्हणुन पुण्यात शिक्षण घेत असून याबद्दल तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.         परळी येथील शिक्षिका श्रीमती. पुष्पा  कुलकर्णी, नायगावकर यांची  शुभा ही नात आहे.तिच्या यशाबद्दल परळीतील आश्विन मोगरकर, नेताजी पालकर शिवाजी पालाकुडतेवार,नितीन समशेट्टे यांनी  कौतुक केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावरील 8 जूनची सभा रद्द

इमेज
मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावरील 8 जूनची सभा रद्द   मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 4 जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायण गडावर सभा होणार होती. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध नाही. तसेच उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. त्यामुळे एकत्र येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय नको, यासाठी नारायण गडावरील सभा रद्द करण्यात आली आहे. आता पुढील सभा कधी होणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, तुर्तास आठ जून रोजीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा करत असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळेच  मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पा...

निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन

इमेज
  उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर  लक्ष द्यावे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन         बीड, दि.16 (जि. मा. का.) :- आगामी दिवसामध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते.  उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर दयावा. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने  रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे. तसेच उष्माघात उपचारासाठी शासकीय रूग्णालयांत सज्जता ठेवण्याच्या सुचनाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. उष्माघात होण्याची कारणे         उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे बॉयलर रूममध्येकामकरणे, काचकारखान्यातीलकामकरणे, जास्त तापमानाच्या खोलीतकामकरणे, घट्‌ट कपडयांचा वापर करणे, उष्णतशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे. उष्माघाताची लक्षणे शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्कहोणे, थकवा येणे, ...