इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारती पवार यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवा

 पंकजा मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा


नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारती पवार यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवा



दिंडोरी ।दिनांक १८।

नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. गेल्या दहा वर्षांत देशाची त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल सुरू आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी डाॅ. भारती पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्याने संसदेत पाठवा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज जाहीर सभेत केले.


दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ.भारती प्रविण पवार यांच्या प्रचारार्थ आज  श्रीरंग लाॅन्स सोनगांव सायखेडा येथे आयोजित केलेल्या जाहिर सभेत त्या बोलत होत्या. 


  लोकनेते मुंडे साहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा मी पुढे घेऊन जात आहे, याबाबत कुणाचं दुमत असण्याचे कारण नाही कारण ते माझे केवळ माझे पिता नव्हते तर ते माझे नेते होते, त्यांनी जे संस्कार आम्हाला दिले आहेत त्यानुसार माझी वाटचाल सुरू आहे. आज भारतीताईंच्या मागे एक महिला म्हणून मी खंबीरपणे उभी आहे. 

नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश आज विकासाच्या वाटेवर आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी  विराजमान करून राष्ट्रहित साधून भारताचा झेंडा विश्वस्तरावर अविरतपणे फडकविण्यासाठी डाॅ.भारती पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून देशाच्या संसदेत पाठवावे असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.


या सभेस उमेदवार डाॅ.भारती पवार, निफाडचे आ.दिलीप बनकर यांच्यासह भारतीय  जनता पक्ष आणि महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!