पोस्ट्स

४ जूनला विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करण्याचं केलं आवाहन

इमेज
  लोकनेते मुंडे साहेबांचा ३ जूनला दहावा स्मृतीदिन ; पंकजाताई मुंडे यांचं राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल ; जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये म्हणून घेतला निर्णय ४ जूनला विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करण्याचं केलं आवाहन परळी वैजनाथ।दिनांक ०१। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा येत्या ३ जून रोजी दहावा स्मृतीदिन असून या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरातील समस्त कार्यकर्त्यांना  यावर्षी गोपीनाथ गडावर न येता  जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा असं आवाहन केलं आहे. ४ जूनला लोकसभेची मतमोजणी असल्याने आपल्या विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करा  असंही त्यांनी म्हटलं आहे.    यासंदर्भात सोशल मिडियावर एक व्हिडिओ जारी करून पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना विनंतीवजा आवाहन केलं आह...

वीस हजारांची लाच घेताना कोतवालाला पकडलं; केजचे तहसीलदार फरार

इमेज
  वीस हजारांची लाच घेताना कोतवालाला पकडलं; केजचे  तहसीलदार  फरार केज : रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित जगताप हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे. ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली.  एसीबीने अनेक कारवाया करूनही बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. अभिजीत जगताप हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून जगताप याच्यासाठी वसूलीचे काम करतो. केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने २० हजारांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू तहसीलदार जगताप हा फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.

पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
  पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार   गेवराई (प्रतिनिधी) :- श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 मे रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र गेवराई येथे अंकुशराव आतकरे यांचा गेवराई तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इतर पदाधिकारी पत्रकार यांचा सत्कार थाटामाटा संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते तसेच सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व ग्राहक पंचायत चे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तसेच दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.                   गेवराई तालुक्यातील मनमिळाऊ स्वभावाचे सर्व पत्रकारांना व सर्व सेवाभावी संस्थेला मार्गदर्शन वेळोवेळी त्यांच्या होणाऱ्या अडीअडचणी व पत्रकार मंडळीच्या अडीअडचणीसाठी सदैव उपलब्ध असणारे व सर्वांना मदत करणारे आमचे अंकुशराव आतकरे हे सलग बारा वर्षे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नि...

गझलकार दिवाकर जोशी यांना यावर्षीचा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार जाहीर

इमेज
  गझलकार दिवाकर जोशी यांना यावर्षीचा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार जाहीर परळी वै. दि. 29/05/24 (प्रतिनिधी) नाना बेरगुडे स्मृती समिती सेलू जि.परभणी यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा आणि मराठी गझलेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार यावर्षी परळी येथील सुप्रसिध्द गझलकार दिवाकर जोशी यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र काव्यक्षितिजावर , विशेषतः गझलेच्या प्रांतात अल्पावधीतच दिवाकर जोशी यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. तंत्रशुद्ध गझललेखन करून आपल्या प्रभावी सादरीकरणाने त्यांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली आहेत.  आशय आणि अभिव्यक्ती यांच्या अभिन्नत्वामुळे व गेय गझल सादरीकरणाने त्यांची गझल रसिकमनात कायमस्वरूपी घर करून राहते. त्यांच्या सातत्यपूर्ण, दर्जेदार व महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या गझललेखनाची दखल घेऊन समितीने आज या मानाच्या पुरस्काराची घोषणा केली. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका विशेष समारंभात त्यांना  हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान क...

अल्पवयीन मुलीस पळवून नेले : गुन्हा दाखल

इमेज
  अल्पवयीन मुलीस पळवून नेले : गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     आपल्या 16 वर्षिय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद पिडितेच्या आईने दिली असुन परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील सिद्धार्थनगर भागातून  एका 16 वर्षिय मुलीला कोणीतरी अज्ञात आरोपीने दि.29/05/2024 रोजी दुपारी 2.00 ते 5.30 वा. दरम्यान अज्ञात कारणासाठी अज्ञात, ठिकाणी पळवुन घेवुन गेले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर परळी वै येथे गुरन 87/2024 कलम 363 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि ससाने हे करीत आहेत. 

शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त 31ते 7 विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन: रविवारी रक्तदान शिबीर

इमेज
शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त 31ते 7 विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रविवारी रक्तदान शिबीर परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)         येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार (ता.३१) ते शुक्रवार (ता.०७) करण्यात आले आहे.          येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह, श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात शुक्रवारी (ता.३१) ते शुक्रवार (ता.०७) पर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.०६) संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल, यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा महाप्रसाद शनिमंदिर मध्ये होणार आहे.  त्याचबरोबर शुक्रवारी (ता.३१) सकाळी ८ वाजता शोभायात्रा हनुमान ...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
  परळीत उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन रॅली व शोभायात्रेचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     परळीत उद्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन रॅली व शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहेत.             सकल धनगर समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे उद्या 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम होणार आहे.होळकर चौक परळी वै. येथे सकाळी 9 वा. ध्वजारोहण होईल त्यानंतर पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अभिवादन रॅली निघणार आहे.होळकर चौक, गणेशपार, अंबेवेस मार्गे ही रॅली वैद्यनाथ मंदिर येथे जाईल. वैद्यनाथ मंदिरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन व अभिवादन करण्यात येईल.सायं.4 वा. होळकर चौक  ते राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक शोभायात्रा काढण्यात येणार ...