श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुरू असलेल्या विकास कामांची धनंजय मुंडेंकडून पाहणी पूर्वेकडील प्रवेशद्वार, पायऱ्या यांसह प्रदक्षिणा मार्गाचे काम गतीने सुरू परळी वैद्यनाथ (दि.29) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य शासनाकडून 286 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची आज मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मंदिराच्या पूर्वेस असलेल्या मुख्य प्रवेशद्वार, स्वागत कमान, मेघडंबरी, तसेच मंदिराकडे जाणाऱ्या चिरेबंदी दगडातील पायऱ्यांचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामांची पाहणी करून धनंजय मुंडे यांनी अधिकारी व कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना दिल्या. चिरेबंदी दगड बसवताना ते एका रेषेत असावेत तसेच खालीवर होऊ नये त्यावर खड्डे पडणार नाही यासाठी योग्य दगडाची निवड करून त्यांचे रचना उत्तमरीत्या करावी अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या. प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या भोवती मेरू पर्वताकडून जाणाऱ्या मंदिर प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले असून त्यावर आता ना...