पोस्ट्स

#mbnews# >>>>बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

इमेज
  गुटखा पकडला : एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  दिंद्रुड, प्रतिनिधी...  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या संशयित कंटेनरला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान भोपा पाटी वर पकडले असता जवळपास एक कोटी रुपयांचा राज निवास पानमसाला गुटखा आढळून आला. दिंद्रुड पोलीस  स्टेशनला कंटेनर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती.        गोपनीय माहितीच्या आधारे तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या एका कंटेनरला स्थानिक गुन्हे शाखेचा दोन पथकांनी पकडत दिंद्रुड पोलीस स्टेशनला आणले असता जवळपास 75 लाख रुपयांचा राजनिवास पानमसाला नावाचा गुटखा व अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती.  बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान चांद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे स...

भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात

इमेज
  भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात   परळी (प्रतिनिधी):                 येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित एक संस्कारक्षम पिढी घडविणारी, पालकांच्या प्रथम पसंतीस उतरलेले, एकमेवाद्वितीय भेल संकुलामध्ये इ .स 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील सी.बी.एस.ई व स्टेट या शाखांमधील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत गुणगौरव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मा. डाॅ.श्री हेमंत वैद्य (सहकार्यवाह, भा. शि. प्र. सं अंबाजोगाई) आणि मा श्री. शरद राठोड साहेब (वेल्फेअर ऑफिसर) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. जीवनराव गडगूळ (सचिव ) यांनी भूषवले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री. राहुल सूर्यवंशी सर व सौ.सुमेधा कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या संघाने 'सरस्वती स्तवन' व 'सामूहिक पद्य' सादर करून केली. त्यानंतर संकुलामधील सी.बी.एस.ई व स्टेट विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच...

##mbnews# >>> आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर

इमेज
  आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर; रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आक्षेप अर्ज भरुन द्यावेत- अनंत इंगळे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी-परभणी  रेल्वे मार्ग दुहेरीकरण कामासाठी नागरी वस्त्यांमधील जमीनींचाही मोठ्या प्रमाणावर राजपत्रात समावेश आहे.हे अन्यायकारक असुन याबाबत नागरिकांनी अधिकाधिक आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे.यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आपले आक्षेप अर्ज भरुन द्यावेत असे आवाहन  रा.काॅ.शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.         परळी- परभणी रेल्वे  मार्गासाठी जमीन आधिग्रहन करण्याची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने काढली आहे. याकामी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.याबाबत रेल्वे मंत्रालयाने दि 18 जून 2024 रोजी काढलेल्या राजपत्रानुसार परळी रेल्वे स्थानक भागातून गंगाखेडच्या दिशेने असलेल्या नागरी वस्त्यांमधील व या भागातील अनेक जमिन...

#mbnews#>>महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना

इमेज
  महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या  महामॅरेथॉन स्पर्धेत  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.         राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी शहर पोलीस स्टेशन समोरुन 'संत सेवालाल महाराज चौक' येथून सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 7:00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी-वै च्या वतीने शालेय गट,खुला गट,ज्येष्ठ नागरिक गट,महिला गट या चार गटात 'महामॅराथॉन स्पर्धा' आयोजित केली असून 'Green Parli...Clean Parli' हा निर्धार या 'महामॅराथॉन' स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 'महामॅराथॉन' स्पर्धेत प्रत्येक गटात आकर्षक पारितोषिक,मानचिन्ह प्राप्त होणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रविण्य प्रमाणपत्र आणि एक वृक्ष भेट दिले जाणार आहे.     नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून 'हरीत परळी.. स्वच्...

वरळी ते परळी एकच जल्लोष

इमेज
पंकजा मुंडेंचा विजय ; परळीसह बीड जिल्ह्यात शहरे,गावागावात, वाडी,वस्ती,तांड्यांपासून ते गल्लोगल्लीत आनंदोत्सव  विधानभवन परिसर, प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष ढोल ताशांचा निनाद, गुलालांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी   विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणला मुंबई।दिनांक०१।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीत पहिल्या पसंतीची मते घेऊन दणदणीत विजय संपादन केला.  या विजयानंतर परळीसह जिल्ह्यात अक्षरशः आनंदोत्सव साजरा झाला. विधानभवन परिसर आणि भाजप प्रदेश कार्यालया समोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली.  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला.     विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी निकाल जाहीर झाला, यात पंकजाताई मुंडे पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाल्या, विजयासाठी २३ मतांचा कोटा असताना त्यांना २६ मते मिळाली. विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. कार्यकर्त्यांचा जल्लोष ; वि...

मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव

इमेज
मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव परळी/प्रतिनिधी शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांचा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर आमदार म्हणून विजय झाल्याबद्दल परळीत शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी फटाके फोडून व गुलाल उधळून मोठा आनंदोत्सव साजरा केला. आज विधान परिषदेच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार म्हणून विजयी झाले. ही बातमी समजताच परळी शहरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक येथे सायंकाळी शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली मोठा जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी फटाके फोडून, गुलाल उधळला व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते प्रा.अतुल दुबे सर, मा.शहर संघटक संजय कुकडे, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,  युवा सेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन...

पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष

इमेज
पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष परळी वैजनाथ ता.१२ (प्रतिनिधी)           भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षाच्या वतीने विधानपरिषदेवर उमेदवारी घोषित करण्यात आली होती. शुक्रवारी (ता.१२) झालेल्या मतदानात विजयी झाल्याबद्दल शहरात विविध ठिकाणी गुलाल उधळून, फटाक्यांची आतिषबाजी करत  स्थानिक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.            भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून त्यांचे पक्षाच्या वतीने पुर्नवसन करा अशी मागणी समर्थकांच्या माध्यमातून सातत्याने होत होती. पंकजा मुंडे यांचे राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणूक वेळोवेळी संभाव्य यादीत नाव येत होते. पण पाच वर्षांत काही नंबर लागला नाही. यामुळे पक्षाने लोकसभेच्या निवडणूकीत डॉ प्रितम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यानंतर महाराष्ट्रातील समिकरणे बघता व ओबीसी, मराठा आरक्षण प्रश्न तसेच...