पोस्ट्स

युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 2 ऑगस्टला ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे आयोजन

इमेज
  युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत  2 ऑगस्टला ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे आयोजन  बीड, दि. 01: महसूल पंधरवाडा निमित्त, जिल्हाधिकारी कार्यालय व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्य प्रशिक्षण योजनाकरिता बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांकरिता ऑनलाईन व ऑफलाइन नोंदणीचे आयोजन शुक्रवार दिनांक 02 ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे.  जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी आस्थापना, सहकारी बँक इत्यादी मध्ये सहा महिने ऑन जॉब ट्रेनिंग घेणे करिता नोंदणी सुरू आहे. यामध्ये नोंदणी केल्यानंतर आस्थापनेच्या आवश्यकतेप्रमाणे निवड झाल्यास बारावी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 6000/-, आयटीआय व डिप्लोमा करिता 8000/-, पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण बेरोजगारांकरिता 10000/-  मानधन/विद्या वेतन पुढील  सहा महिने सदर कार्यालयात, आस्थापनेत, कंपनीत, बँक मध्ये पंजाब प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रशिक्षणसह प्रमाणपत्र देण्यात येईल.  येथे होईल ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी याकरिता दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकत...

Motivational Story: धूर भरल्या डोळ्यांत,साकारले सोनेरी स्वप्न >>>✍️लेखक- ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर

इमेज
  धूर भरल्या डोळ्यांत, साकारले सोनेरी स्वप्न डों गर उतारावर पत्र्याचं झप्पर.... पुढे गवताने शेकारलेलं खोपट..... आठ-दहा दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीने आजू-बाजूला चिखलाने झालेली चिकचिक... समोर शेळ्या-जनावरासाठी केलेलं गवताच आणखी एक छप्पर.... त्यात कोप-यात लाकूड-फाटा जमवून स्वयंपाकासाठी आणून ठेवलेलं जळण.... तेही पावसाचा वसारा येऊन आर्धवट भिजलेलं.....  ..... नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली.... पावसामुळे अनेकदा रात्री वीज गायब होते..... म्हणून सुमनबाईने यरवाळीचं रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली... पत्र्याच्या छप्परापुढील गवताच छप्पर हेच सुमनबाईचं 'किचन'! आर्धवट भिजलेला लाकूडफाटा चुलीजवळ आणून ठेवलेला.... गवताचं खोपट गळकचं असल्याने सगळीकडे ओलावा... त्यात सुमनबाईने स्वयंपाकाची तयारी केलेली.... ज्वरीच्या पिठाचा डबा, पाण्याची चरवी (विशिष्ट भांड) जवळ घेतलेली. चूल पेटविण्यासाठी रद्दी कागदाचे तुकडे जवळ घेतलेले.... अर्धवट भिजलेल्या जळणातील बारीक काड्या-मुड्या चुलीत घातल्या, मध्ये कादाचे तुकडे टाकून चूल पेटविण्याची धडधड सुरू..... कागदाने कसाबसा पेट घेतला.... ओल्या काटक्याचा धूर झाला....

आ पंकजा मुंडे वाढदिवस:प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

इमेज
 आ. पंकजा मुंडे वाढदिवस:प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गणवेश व  शैक्षणिक साहित्य वाटप परळी प्रतिनिधी : लोकनेत्या माजी मंत्री तथा नवनियुक्त विधानपरिषद आमदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमिताने माजी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गरजू व अनाथ मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटलं करण्यात आले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे यांच्या समवेत भाजपा कार्यकर्ते मोहन जोशी,प्रशांत कराड,अमिश अग्रवाल,योगेश पांडकर आदी जण उपस्थित होते. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास युवा नेते निळकंठ चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या मध्ये अभ्यासा बरोबरच खेळाचे महत्व विद्यार्थी जीवनात कशा प्रकारे महत्वाचे आहे या बद्दल मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी अत्ता पासूनच जीवनात यश मिळवण्यासाठी आपले ध्येय निश्चित करून त्या अनुषंगाने कसा अभ्यास केला पाहिजे या विषयी प्रा पवन मुंडें यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक श्री श्रीहर...

किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

इमेज
  किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड गंगाखेड (प्रतिनिधी) : गंगाखेड तालुक्यातील पोकर्णी (वाळके ) येथी अल्प भूधारक सुमनबाई आणि महादेव करे या कष्टाळू शेतकरी दांपत्याचा मुलगा मनोज करे यांची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. मनोज करे यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. पोकर्णी (वाळके) येथील अल्पभूधारक शेतकरी दांपत्य सुमनबाई आणि महादेव करे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मनोज यांना शिक्षण दिले. शेतीच्या उत्पन्नात शिक्षण देणे खूप जिकिरीचे होते. परंतु महादेव आणि सुमनबाई यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. मनोज यांनीही अत्यंत तुटपुंज्या साधन सामग्री मध्ये जिद्दीने अभ्यास केला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प

इमेज
ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प अनेक भागात रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्यही मिळत नसल्याने, गरिबांचे हाल होतायत.स्वस्त धान्य योजनेतील धान्य ग्राहकांना देण्यासाठी वापरण्यात येणारे ई-पॉस मशीनचे सर्व्हर तांत्रिक समस्येमुळे  बंद आहे. त्यामुळे  तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वस्त धान्य योजनेचे लाभार्थी ग्राहकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर थंब द्यावा लागत आहे. परंतु, आठवडाभरापासून सर्व्हरच डाऊन असल्याने ग्राहकांना दुकानात चकर माराव्या लागत आहेत.तालुक्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोरजी यंत्रणा असलेल्या ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. टू जी नेटवर्क असलेल्या मशीन बदलून फोरजी नेटवर्कच्या मशीन दिल्या आहेत. मात्र, महिनाभरापासून यामध्ये अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. धान्य वितरण व्यवस्था त्वरित सुरळीत करा सद्यःस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातच ई-पॉस मशीनला सर्व...

वाल्मिकअण्णा कराड यांचा सत्कार

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वाल्मिकअण्णा कराड यांचा सत्कार परळी वैजनाथ दि.३१ (प्रतिनिधी) '    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष वाल्मिकअण्णा कराड यांची नियुक्ती झाल्याबद्दल तेली युवक संघटनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.      यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवन फुटके, महाराष्ट्र  प्रांतिक तैलिक  महासभेचे तालुकाध्यक्ष मोहन राजमाने, शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत,सचिव सोमनाथ वाघमारे, तेली युवक संघटनेचे उपाध्यक्ष रवी अन्नपुर्णे, शंकर कौले, प्रकाश नखाते,सुजीत क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Mbnews.....संघाचे उत्कृष्ट सादरीकरण

इमेज
  समरगीत स्पर्धेत परळीच्या संघाला तृतीय पारितोषिक  श्रमानेच उध्दार या  गीताला मिळाले बक्षीस  संघाचे उत्कृष्ट सादरीकरण परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धेचे लातुर येथील कामगार कल्याण भवनात बुधवारी (दि. ३१जुलै) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परळीच्या समरगीत संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  या स्पर्धेचे पारितोषिक वितरण जेष्ठ कवी योगिराज माने, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, शंकर जगतात, रूपाली नाईक, विजय धायगुडे, पत्रकार धीरज जंगले यांच्या उपस्थितीत झाले. परळीच्या समरगीत संघाने कामगारांच्या कामावर आधारित श्रमानेच उध्दार हे समरगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संघाने उत्कृष्ट सांघिक सादरीकरण केल्याने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले.  या संघात सुरसंगम संगीत विद्यालय व फाऊंडेशन शाळेच्या विद्यार्थिनीं कृतिका टाक, सिया तोतला, नेतल शर्मा, श्रीजा दहातोंडे, साक्षी सावजी, नेतल दाड, सिद्धी सानप, पुजा शिंदे, आरूषी होलानी, शिवानी सलगरे, वैभवी सावजी यांचा सहभाग होता. तर पेटीवादकाची साथ संगीत शिक्षक...