इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

वाल्मिकअण्णा कराड यांचा सत्कार

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वाल्मिकअण्णा कराड यांचा सत्कार




परळी वैजनाथ दि.३१ (प्रतिनिधी)

'    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष वाल्मिकअण्णा कराड यांची नियुक्ती झाल्याबद्दल तेली युवक संघटनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

     यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवन फुटके, महाराष्ट्र  प्रांतिक तैलिक  महासभेचे तालुकाध्यक्ष मोहन राजमाने, शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत,सचिव सोमनाथ वाघमारे, तेली युवक संघटनेचे उपाध्यक्ष रवी अन्नपुर्णे, शंकर कौले, प्रकाश नखाते,सुजीत क्षिरसागर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या