पोस्ट्स

थाईलेसिमिया आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर परिवाराच्या चेहेऱ्यावर हास्य फुलविले

इमेज
  76 व्या वेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोलीस कर्मचारी दत्तात्रय गायकवाड थाईलेसिमिया आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर परिवाराच्या चेहेऱ्यावर हास्य फुलविले परळी/प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची उत्तम उदाहरण असलेल्या परळी वैजनाथ येथील रहिवासी व नांदेड येथे कार्यरत असलेल्या दत्तात्रय गायकवाड या पोलीस कर्मचार्‍याने एक  आदर्श निर्माण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. थाईलेसिमिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर या बालकास  परळीतील रहिवाशी असलेले पोलीस कर्मचारी, श्री. दत्तात्रय गायकवाड यांनी रक्तदान करून समाजासाठी एक प्रेरणादायक संदेश दिला आहे.सामाजिक कार्यात आपल्या सक्रिय सहभागामुळे श्री. दत्तात्रय गायकवाड यांचे नाव एक आदर्श म्हणून घेतले जाते. त्यांनी आपल्या 76 व्या रक्तदानाने अनेकांची जीवनरक्षणात मदत केली आहे, आणि त्यांच्या या कार्यामुळे रक्ताच्या अभावी होणाऱ्या अनेकांची अडचण दूर झाली आहे.त्यांच्या रक्तदानाच्या या अविरत कार्यामुळे अनेक रुग्णांची जीवंत राहण्याची आशा वाढली आहे. श्री. गायकवाड यांचे कार्य समाजात रक्तदानाची गरज आणि महत्व यावर जागरूक...

परळीत भरवस्तीत घरफोडी, सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

इमेज
  परळीत भरवस्तीत घरफोडी, सव्वादोन लाखाचे दागिने लंपास परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील गजबजलेल्या स्नेहनगर भागात शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे धाडसी चोरी झाली असुन कपाटात ठेवलेले 2 लाख 28 हजार 500 रुपयांचे  सोन्या चांदीचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील स्नेहनगर भागातील गोपाल श्रीकिशन पुरोहित यांच्या घराचे कुलुप तोडुन शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान घरात प्रवेश करुन कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले तीन तोळ्याचे मंगळसूत्र,एक तोळ्याच्या बिंदीया,दोन तोळ्याच्या अंगुठा,एक तोळ्याची साखळी,चांदीचे शिक्के,चैन,ग्लास,जोडवे असे 2 लाख 28 हजार 500 रुपयांचे दागिणे लंपास केले आहेत.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 331(4),305 बीएनएस 2023 कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने हे करत आहेत. .............. शहरात मोठा गाजावाजा करत CCTV बसवूनही छोटे मोठे गुन्हे सतत घडत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक बसण्या...

दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांना मातृशोक

इमेज
  दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांना मातृशोक  माजलगाव (प्रतिनिधी):- सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक  प्रा.डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या मातोश्री केशरबाई उत्तमराव साळवे यांचे गुरुवार दि.८ रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर माजलगाव येथील मंगलनाथ स्मशानभूमीत दुपारी 1 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.       मातोश्री केशरबाई साळवे या गेल्या काही दिवसांपासून आजारी यातच त्यांचे भिमनगर येथील राहत्या निवासस्थानी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते.  मायाळू स्वभावाची व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ महिला म्हणून त्या परिसरात परिचित होत्या. माजलगाव  नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती राजेश साळवे यांच्या त्या काकू होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.      त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी सिने नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज तसेच माजलगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेनी केली परळी तहसील कार्यालय निदर्शने

इमेज
  शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेनी केली परळी तहसील कार्यालय निदर्शने  परळी ता.8 प्रतिनिधी       शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लावलेले होल्ड काढावेत, वाण धरणावरील तोडलेली वीज तात्काळ जोडून द्यावी, मागच्या वर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. या मागणीसाठी गुरुवारी ता.8 महाराष्ट्र राज्य किसान सभेनी परळी तहसील कार्यालयावर निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ भगवान बडे, धनंजय सोळंके, कॉ मनोज देशमुख, कॉ पप्पु देशमुख आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी स्वीकारले.

विशाल राष्ट्रध्वजाची वैद्यनाथ मंदीर प्रांगणात उभारणी करावी-योगेश पांडकर

इमेज
  विशाल राष्ट्रध्वजाची वैद्यनाथ मंदीर प्रांगणात उभारणी करावी-योगेश पांडकर  परळी प्रतिनिधी: परळी शहरालगत असलेल्या बालाघाट डोंगरावरील १५० फूट उंचीचा विशाल तिरंगा ध्वजाचे १३ ऑगस्ट २०२२ साली पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,माजी खा.प्रीतमताई मुंडे,जिल्हाधिकारी, तहसीलदार,नगर परिषदेचे मुख्याधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडून फडकवला होता.  आपल्या परळी ची शान वाढवत परळीच्या पंचक्रोशीतून हा ध्वज दिसत होता तसेच परळी शहरात प्रभू वैजनाथाचं दर्शन घेण्यासाठी देशातून अनेक भाविक येत असतात त्यांनाही हा तिरंगा ध्वज आकर्षित करत असत पण मागील काही महिन्यात हा ध्वज दिसत नसून फक्त खांब दिसत आहे.   नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले होते पण काही दिवस हा ध्वज फडकवून नंतर काढून घेतात. हा तिरंगा ध्वज डोंगरावर असल्याने वाऱ्याचा वेग जास्त येत असेल आणि त्यामुळे काही अडचणी येत असतील तर या ध्वजाची जागा बदलून प्रभू वैद्यनाथ मंदिर च्या प्रांगणात फडकवला जाऊ शकतो.   स्वातंत्र दिवस जवळ येत आहे त्यामुळे १५ ऑगस्ट पूर्वी हा १५० फुटी विशाल तिरंगा ध्वज फडकवला जावा आण...

बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार: जनतेने प्रशासनाला आवगत करावे

इमेज
  बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार: जनतेने प्रशासनाला आवगत करावे       बीड, दि. 6 (जि. मा. का.) बोगस वैद्यकीय व्यवसायीक आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निर्देश आज झालेल्या बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत एकत्रितरीत्या घेण्यात आले.     आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, प्र.पोलीस उपअधीक्षक उमा शंकर कस्तुरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन आर.एम. बजाज, यांच्यासह समितीवरील सदस्य उपस्थित होते. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची स्थापना महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षक व औषधी द्रव्य विभाग निर्णय क्र.सीआयएम 1099/ प्र.क्र.355/99/अधिनियम/दि. 07/02/2000 अन्वये गठित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात येते.  आज झालेल्या  बैठकीतील चर्चेनुसार बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर जिल्हयात आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल तसेच नागरीकांना अशी माहिती आढळल्...

94.34% अर्जांची छाननी करून स्वीकृती मोबाईल संदेश

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : बीड जिल्ह्यात 'या' तारखेला पडणार पैसे ! 94.34% अर्जांची छाननी करून स्वीकृती मोबाईल संदेश बीड, 1 : बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज दाखल केले असून 94.34 % टक्के अर्जांची छाननी करून मोबाईलव्दारे स्वीकृती संदेश  देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांची नोंदणी आणि अर्जाची पडताळणी करण्याची विशेष मोहीम जिल्हयात सुरू असून याअंतर्गत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करून 3,32,892 लाभार्थी महिलांच्या अर्जांना स्वीकृती देऊन मोबाईल संदेश पाठविण्यात आलेले असून आजपर्यंत  94.34 %टक्के काम झालेले आहे.           ज्यांचा ऑनलाईन अर्ज भरतांना कागदपत्राच्या बाबतीत  काही त्रुट्या आढळून आले आहेत. त्यांच्या मोबाईलवर संदेश जात असून अश्या अर्जदार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या मोबाईल ऍप वरून ऑनलाइन अर्ज भरला आहे त्याच मोबाईल मधून अर्ज दुरूस्त (एडिट) कर...