पोस्ट्स

शिवीगाळ व धक्काबुक्की: तुला उचलून घेऊन जातो म्हणत शेजारणीला धमकी;गुन्हा दाखल

इमेज
  शिवीगाळ व धक्काबुक्की: तुला उचलून घेऊन जातो म्हणत शेजारणीला धमकी;गुन्हा दाखल   परळी वैजनाथ  प्रतिनिधी...            घराशेजारी राहणाऱ्या एका 35 वर्षीय युवकाने एका महिलेला  शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्याचप्रमाणे वाईट हेतूने फिर्यादी महिलेचा हात धरून तुला उचलून घेऊन जातो असे म्हणून धमकी दिल्या प्रकरणी एका जणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी चाळीस वर्षीय महिला रा.सटवाईचा मळा परळी वै.या आरोपी सचिन वैद्यनाथ नाईकवाडे वय 35 वर्षे रा.सटवाईचा मळा ता. परळी वै. याच्या शेजारीच राहतात.दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 11.43 वा. आरोपी फिर्यादी महिलेस बोलू लागला. तेंव्हा मला बोलू नको असे महिला म्हणली असता त्याने शिवागाळ केली. अंगावर येवुन वाईट भावनेने हात धरला व फिर्यादीला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच फिर्यादीचे मुलास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व फिर्यादीस उचलुन घेवुन जातो असे म्हणत धमकी दिली म्हणुन आरोपीविरुद्ध गु.र.न. 130/2024 कलम 74, 75, 115...

गावातून पहिली पीएसआय: लिंबोटा येथील कन्या पोलीस उपनिरीक्षक : निवडीबद्दल सत्कार

इमेज
  गावातून पहिली पीएसआय: लिंबोटा येथील कन्या झाली पोलीस उपनिरीक्षक : निवडीबद्दल सत्कार  परळी वैजनाथ दि १७ (प्रतिनिधी) :- लिंबोटा गावची सुकन्या कु. राणी दत्तू कराड हिने पीएसआय होण्याचा गावात पहिला मान मीळवला. एम.पी.एस.सी परीक्षेत मार्फत व्ही जे एन टी मध्ये महाराष्ट्रात पहिली आली. नुकत्याच झालेल्या एम.पी.एस.सी परीक्षेत ती राज्यातून एमपीएससी परीक्षेतून पहीली आली. वडील शेतकरी आई घरकाम आणि मजुरी करते (एवढ्या कठीण परस्थीतीत तीने स्वःताच्या बळावर व आई वडीलांचा जिद्दीने शिकत राहीली. लिंबोट्यात तेव्हा आठवी ते दहावी पर्यन्त ची शाळा पांगरीला वश श्री संत भगवान बाबा विद्यालयात शिकली आणि ११ वि व १२ पर्यंत शिक्षण तिचे फुलचंद भाऊ कराड यांनी महाविद्यालय आणल व मुलीचा शिक्षणाची सोय केली. राणीच शिक्षण भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ येथे झाले. पुढे तीने एम पी एस सी चा आभ्यास पुण्याला केला. आई वडील कमी पैसे देत होते तरी ती खचली नाही. लिंबोट्या सारखा छोट्या गावातून ती आज पीएसआय झाली. ही ही बाब गावच्या नागरिकांना खुप आभीमानाची गोष्ट आहे. आज श्री संत भगवान बाबा शाळेत संस्थाचालक फुलचंद  कराड यांच...

श्रेयस व प्रेयस याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी-पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे

इमेज
  श्रेयस व प्रेयस याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी-पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे  परळी, दि. 17/08/2024 (प्रतिनिधी)....    आपल्या हितासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य, उचित काय म्हणजे श्रेयस व आपल्याला प्रिय वाटणारे,आवडीचे म्हणजे प्रेयस या दोन्हीचीही जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी तरच त्यांची जडणघडण व जीवनातील वाटचाल योग्य होईल असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक  योगेश शिंदे यांनी केले. येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आयोजित  नुकताच पालक मेळाव्यात ते बोलत होते.           या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा.योगेश शिंदे साहेब यांनी "श्रेयस व प्रेयस यांची जाणीव करून देण्याची  मुख्य जबाबदारी पालकांची असल्याचे "मत या प्रसंगी व्यक्त केले.यावेळी सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्र खुली आहेत त्या क्षेत्रातील संधीचा वापर करून घ्यावा व पालकांनी आपल्या पाल्याला त्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष जबाबदारी पार पाडावी अशी...

विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ?

इमेज
  विधानसभेच्या तोंडावर परळीच्या महाविकास आघाडीत बिघाडी ? : काँग्रेस शहराध्यक्षांनी खासदार बजरंग सोनवणेंवर व्यक्त केली जाहीर नाराजी परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...          लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म इमानदारीने पालन करून अतिशय कठीण परिस्थितीत खासदार बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या घटक पक्षांचा निवडून आल्यानंतर मात्र त्यांना विसर पडला असल्याचा आरोप करत परळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्यावरील नाराजी जाहीरपणाने व्यक्त केली आहे. त्यामुळे परळीतील एक दिलाने काम करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये हळूहळू बिघाडी होतेय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.         या संदर्भाने परळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुर भाई यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यामध्ये जाहीरपणाने खा. बजरंग सोनवणे यांना निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा विसर पडल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर काल दि....

परळीत बिंगोवर धाड: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

इमेज
  परळीत बिंगोवर धाड: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त  परळी (प्रतिनिधी)...       नवीन पोलिस अधिक्षक बारगळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदयांवर जिल्ह्यात धाडस्त्र सुरू केले आहे. त्यानुसार परळी येथील चक्री जुगार अड्डड्यावर छापा मारून बिंगो जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.          परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाइन बींगो चक्री खुलेआम सुरू असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या आदेशावरून दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता इशारातील संभाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो चक्रीवर धाड मारून एका व्यक्तीसह लॅपटॉप सीपीयू सह ऑनलाइन बिंगो चक्रीसाठी लागणारे साहित्य सह ४०८७० रू मुद्देमाल पोलिसानी जप्त करून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु र न१२९/२४ कलम १२ अ म जू का प्रमाणे गुन्हा दाखल केला.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुतळे,पो.ठोबरे, पो. दुबाले, पो.जोगदंड, पो. घोडके,पो. सानप, पो.कांबळे,पो.जायभाय,पो. वडमारे व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली.

दुःखद वार्ता : भावपुर्ण श्रध्दांजली

इमेज
  पत्रकार संजय खाकरे यांना भगिनीशोक: सौ. वैशाली रामेश्वरअप्पा महाजन यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       येथील पत्रकार संजय खाकरे यांच्या भगिनी सोनपेठ येथील रहिवासी सौ. वैशाली रामेश्वरअप्पा महाजन यांचे आज दिनांक 16 रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 54 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुन असा परिवार आहे.      सौ.वैशालीताई रामेश्वरआप्पा महाजन यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु होते.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सोनपेठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने महाजन व खाकरे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

स्वातंत्र्य दिन:जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्रा.टी. पी. मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
  स्वातंत्र्य दिन:जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्रा.टी. पी. मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी/प्रतिनिधी 78 व्या स्वातंत्र्याच्या दिनाचे औचित्य साधून जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री.प्रा.टी. पी. मुंडे (सर) यांच्या हस्ते भारतीय ध्वजाचे ध्वजारोहन संपन्न झाले.   सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली.   या कार्यक्रमास  शिवरत्न काका मुंडे, फुलारी सर, डॉ. सुरेश चौधरी, भीमराव मुंडे, ओम प्रकाश सारडा, सुदाम लोखंडे, जि.प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे, विनायक गडदे,अँड.अनिल मुंडे,अँड.प्रकाश मुंडे,  दत्तात्रय ढवळे,मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे ,रघुनाथ डोळस, जम्मू शेठ, शेख इलियास ,नवनाथ क्षीरसागर, दीपक फड, श्याम गाडेकर, महेश बँकेचे मुख्याधिकारी उपाध्य साहेब,  मुक्तार भाई , चांद भाई,शेख बाबा , शेख म...