पोस्ट्स

अन् महिला महाविद्यालयात अचानक लागली आग...विद्यार्थिनींनी केली कमाल

इमेज
 कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मॉकड्रील प्रात्यक्षिक परळी, दि.30/08/2024 (प्रतिनिधी)    येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आपत्कालीन स्थितीत त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे आणि लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मॉकड्रील व्यवस्थापन कसे केले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सेफ इंटरप्राइजेस परळी वैजनाथचे संचालक शेख शरीफभाई यांनी दिले.आपत्कालीन व्यवस्थेमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी दिलेले हे सुंदर असे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पाहिले.यावेळी काही विद्यार्थिनींनी या मॉडलचे स्वतःही प्रात्यक्षिक केले. यावेळी श्री अनिल जठार यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मा. संजयजी देशमुख ,संचालिका तथा प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे , संचालिका सौ. छायाताई देशमुख , प्राध्यापक व विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती .

केवायसीसाठी लाडक्या बहिणींना अगोदरच मनस्ताप ;परळीच्या इंडिया बँकेत कर्मचारीच गायब

इमेज
  केवायसीसाठी लाडक्या बहिणींना अगोदरच मनस्ताप ;परळीच्या इंडिया बँकेत ईकेवायसी करणारा कर्मचारीच नाही परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपये रक्कम प्राप्त करून घेण्यासाठी बँकांच्या बाहेर केवायसी करायला रांगा लावलेल्या व  घंटोन् घंटे प्रतीक्षा केलेल्या लाडक्या बहिणींना अगोदरच मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यातच आता परळीच्या इंडिया बँकेतील केवायसी करणारा कर्मचारीच उपलब्ध नसल्याने या सर्व महिलांचे केवायसी चे काम ठप्प झाले आहे.      राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 हजारांची रक्कम मिळत आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आणि पैसे जमा झाले असले तरी बँकेतून ते पैसे हातात येऊ शकलेले नाही. पैसे मिळविण्यासाठी महिलांनी बँकेच्या बाहेर गर्दी केली आहे.  राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकले आहेत. मात्र अने...

आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात

इमेज
  बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा खून ! आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात केज (बीड) :- केज तालुक्यातील शेतात एका महिलेचा चारित्र्याच्या संशया वरून खून झाला असून हा खून तिच्या नवऱ्यानेच केला आहे. खून करून तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. ३१ ऑगस्ट रोजी आंनदगाव (सारणी) ता. केज येथील शेतात आज दुपारी विलास नामदेव आघाव रा. नागझरी ता. धारूर या सालगड्याने त्याची पत्नीचे एका पुरूषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या चारित्र्याच्या संशया वरून डोक्यात काठी मारून जागीच खून केला.  खून केल्या नंतर आरोपी विलास आघाव हा पळून जात असताना पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे घटनास्थळी पोहोचले असुन कार्यवाही करीत आहेत. घटना स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देणार आहेत. मृतदेह अद्याप घटनास्थळीच आहे.

माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार

इमेज
  ऋषीकेश सोमनाथ गडेकर यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार परळी/प्रतिनिधी ऋषीकेश सोमनाथ गडेकर यांची जिल्हा परिषद बीड येथे भटक्या जमाती ब या प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा आज माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माणिकनगर येथील रहिवाशी ऋषीकेश गडेकर यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची नुकतीच परिक्षा दिली होती. यात भटक्या जमाती ब या प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट  रोजी माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार व पेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी नरसिंगराव गडेकर, काँगे्रस आयचे शहर उपाध्यक्ष वैजनाथराव गडेकर, ज्ञानेश्वर खर्डे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर खर्डे, सोमनाथ गडेकर, गजानन गडेकर, ओम खर्डे, गजेंद्र गडेकर, राजकुमार गडेकर, अतुल...

आपघात: कारने दिली धडक ; दुचाकीवरील एकजण ठार

इमेज
  आपघात: कारने दिली धडक ; दुचाकीवरील एकजण ठार परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा....   परळी वैजनाथ तालुक्यातील इंजेगाव येथे घडलेल्या आपघातात एकजण ठार झाला आहे. परळी- सोनपेठ मार्गावर क्रिएटा व दुचाकीची समोरासमोर धडक होवुन झालेल्या अपघातात इंजेगाव येथील एकजण ठार झाल्याची घटना शुक्रवार दि.30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडली.          इंजेगाव येथील ज्ञानोबा पंडित कराड हे आपल्या शेतात काम करुन दुचाकीवरुन घरी येत असताना समोरुन येणाऱ्या क्रिएटा गाडीने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. गावकर्‍यांनी त्यांना रात्री 8.30 वाजता उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त कळताच नातलगांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

परळी वैजनाथ: संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर

इमेज
परळी वैजनाथ: संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर     परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यावरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नेमणुका जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या आहेत.          संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची संख्या 12 (शासकीय व अशासकीय अध्यक्ष व सदस्यासह) इतकी आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे शिफारस पत्रानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्यात राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरिता शासन निर्णयाच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना समीती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी चंद्रकांत मधुकरराव कराड रा. तपोवन, ता. परळी वै., जि.बीड,प्रा. विनोद जगतकर रा. जगतकर गल्ली, परळी वै., जि. बीड, सौ. संगिता इंद्रजित होळंबे रा. हेळंब, ता. परळी वे., जि.बीड,सौ. वनिता भगवंत मुंडे रा. बहादुरवाडी, ता. परळी वै., जि. बीड, नितीन जिवराज ढाकणे रा. आस्वलांबा, ता. परळी वै., जि. बीड,श्रीमती साजन धोंडीराम लोहिया रा. परळी वै., जि. बीड व्यं...

शांतता कमिटी बैठकीत आवाहन

इमेज
  उत्सव काळात शांतता अबाधीत ठेवणे सर्वांचीच जवाबदारी - अति. पो. चेतना तिडके प्रत्येकाने  आपापले कर्तव्य पार पडल्यास इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही - अनिल चोरमाले  परळी/ प्रतिनिधी उत्सव काळात शांतता अबाधीत ठेवणे ही सर्वच नागरिकांची जवाबदारी आहे असे प्रतिपादन अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक चेतना तिडके यांनी परळी येथे गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने येथील श्रद्धा मंगल कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.     या वेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमाले, शहर पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश शिंदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि समाधान कवडे, संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, महावितरणचे सहायक अभियंता पवन देऊळकर, कनिष्ठ अभियंता आकाश कांबळे, नप चे एम.एम. घुगे आदी उपस्थित होते.   प्रत्येकाने  आपापले कर्तव्य पार पाडल्यास इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही असे  प्रतिपादन  उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमाले यांनी केले. चोरमले य...