पोस्ट्स

फुलचंद कराड यांच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले

इमेज
  फुलचंद कराड यांच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ शरद पवारांना भेटले परळी (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी परळी मतदारसंघातील शिष्टमंडळाने आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे शरदचंद्र पवार व खा.सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.   परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत या संदर्भात परळी विधानसभा मतदारसंघात मागील 35 वर्षापासून सक्रिय असलेले फुलचंद  कराड यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर परळी मतदारसंघातून कराड यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी एका शिष्टमंडळाने मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी वाय बी सेंटर मुंबई येथे दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची भेट घेत कराड यांना उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत कराड यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून परळी विधानसभा निवडणुक लढवत 65 हजार मते घेतल

कोणतेही शक्ती प्रदर्शन, रॅली किंवा सभेचे नसणार आयोजन

इमेज
  कृषिमंत्री धनंजय मुंडे गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी भरणार साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज आ.पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी राहणार उपस्थित कोणतेही शक्ती प्रदर्शन, रॅली किंवा सभेचे नसणार आयोजन परळी वैद्यनाथ (दि.22) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत साध्या पद्धतीने भरणार आहेत.  उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.           नेहमी रेकॉर्डब्रेक गर्दी व विक्रमी सभांचे आयोजन करणारे धनंजय मुंडे हे यावेळी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कोणतेही शक्ती प्रदर्शन रॅली किंवा सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.           

परळी मतदार संघ मराठा संवाद दौरा व मतदान जनजागृती अभियान लवकरच!

इमेज
  परळी मतदार संघ मराठा  संवाद दौरा व मतदान जनजागृती अभियान लवकरच! परळी /प्रतिनिधि  परळी मतदार संघात मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृत्वात लवकरच संवाद जन जाग्रती संवाद दौरा संपन्न होणार असून सर्व मराठा समाज बांधवानी या संवाद दौर्यास उपस्थित रहावे असे आवाहन मराठासेवक निकेश पाटील,साईराजे  देशमुख यांनी केले आहे. दरम्यान निकेश पाटील व साईराज देशमुख यांनी मराठा समाज उमेदवारासाठी जरांगे  पाटलांकडे करूया मागणी समजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्याणी स्वतंचा जीवाचा विचार केला नाही असे आपले आदरणीय मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृवात लवकरच परळी मतदार संघ मराठा  संवाद दौरा व मतदान जनजागृती अभियान परळी शहर व ग्रामीण भागात हर घर मराठा अशी थीम करत बांधवांपर्यंत जाऊन निकेश पाटील व साईराज देशमुख संवाद साधणार आहेत.

MB NEWS :दर्जा बातमीचा..आवाज जनसामान्यांचा.मागोवा बातमी मागच्या बातमीचा !

इमेज
   ' नॅक' पुनर्मूल्यांकनासाठी महिला महाविद्यालय सज्ज परळी वैजनाथ दि.२१  (प्रतिनिधी )      येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास पुनर्मूल्यांकनासाठी ' नॅक' तज्ज्ञांची समिती आज महाविद्यालयास भेट देणार आहे.           या भेटीत त्यांच्याद्वारा महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी केली जाते. त्यात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम , समाजोपयोगी घेतलेली भूमिका ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य ,कार्यालयीन कामकाज  अशा विविध पातळीवरचे मूल्यांकन करून 'नॅक ' समितीतर्फे ग्रेड देण्यात येत असतो. दि. २२ व २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ' नॅक ' पुनर्मूल्यांकनासाठी महाविद्यालयाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे व नॅक मूल्यांकनासाठी  महाविद्यालय सज्ज असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या ,डॉ. विद्या देशपांडे यांनी माध्यमांस सांगितले आहे. या पूर्वी दोन वेळा या महाविद्यालयाने ही मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून बी हा दर्जा प्राप्त केला आहे . आता तिसऱ्या मुल्यांकनासाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे .

MB NEWS : दर्जा बातमीचा... आवाज जनसामान्यांचा..मागोवा बातमी मागच्या बातमीचा !

इमेज
  चोरट्यांचा सुळसुळाट: परळी बसस्थानकात बसमध्ये चढतांना सोन्याचे मनीमंगळसुत्र तोडून लंपास परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       सध्या परळी वैजनाथ शहरात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.बसस्थानकात बसमध्ये चढतांना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून लंपास करण्यात आले आहे.याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.        पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, कांगणेवाडी ता. आंबाजोगाई जि. बीड. येथील 65 वर्षीय फिर्यादी रुक्मीणबाई बालासाहेब कांगणे या दि. 21/10/2024 रोजी दुपारी 2.00 वा सुमारास परळी बसस्थानक येथे परळी - धर्मापुरी बस मध्ये चढत असतांना अज्ञात आरोपीने या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून लंपास केले आहे. त्या परळी वै. बस स्थानक येथुन धर्मापुरी कडे जाण्यासाठी परळी - धर्मापुरी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या गळ्यातील 9½ ग्रॅम वजनाचे जुने वापरते सोन्याचे मनी मंगळसुत्र  (एकुण किंमत अंदाजे 65,000/ रुपये)  अज्ञात चोरट्यांने तोडुन काढुन चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुरन 176/2024 कलम 303 (2) बी.ए

भाजपचे हिंदुत्व नकली असल्याचा आरोप

इमेज
काँग्रेसची 96 जागांवरील चर्चा पूर्ण:​​​​​​​जागावाटपावर उद्या पुन्हा ठाकरे - पवारांशी चर्चा - पटोले; भाजपचे हिंदुत्व नकली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा करत काँग्रेसची 96 जागांवरील बोलणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या 96 जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. क

या 15 जणांना एबी फॉर्मचं वाटप

इमेज
  अजित पवारांकडून उमेदवार यादीपूर्वीच 15 जणांना एबी फॉर्मचं वाटप राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर होऊ शकते. यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत आहेत.         राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर होऊ शकते. यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी (NCP Ajit Pawar Group Candidate List) आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 15 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.  राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार