प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS :दर्जा बातमीचा..आवाज जनसामान्यांचा.मागोवा बातमी मागच्या बातमीचा !

   'नॅक' पुनर्मूल्यांकनासाठी महिला महाविद्यालय सज्ज


परळी वैजनाथ दि.२१  (प्रतिनिधी )

     येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास पुनर्मूल्यांकनासाठी ' नॅक' तज्ज्ञांची समिती आज महाविद्यालयास भेट देणार आहे.     

     या भेटीत त्यांच्याद्वारा महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी केली जाते. त्यात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम , समाजोपयोगी घेतलेली भूमिका ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य ,कार्यालयीन कामकाज  अशा विविध पातळीवरचे मूल्यांकन करून 'नॅक ' समितीतर्फे ग्रेड देण्यात येत असतो. दि. २२ व २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ' नॅक ' पुनर्मूल्यांकनासाठी महाविद्यालयाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे व नॅक मूल्यांकनासाठी  महाविद्यालय सज्ज असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या ,डॉ. विद्या देशपांडे यांनी माध्यमांस सांगितले आहे. या पूर्वी दोन वेळा या महाविद्यालयाने ही मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून बी हा दर्जा प्राप्त केला आहे . आता तिसऱ्या मुल्यांकनासाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे .







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या