प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS : दर्जा बातमीचा... आवाज जनसामान्यांचा..मागोवा बातमी मागच्या बातमीचा !

 चोरट्यांचा सुळसुळाट: परळी बसस्थानकात बसमध्ये चढतांना सोन्याचे मनीमंगळसुत्र तोडून लंपास


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      सध्या परळी वैजनाथ शहरात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.बसस्थानकात बसमध्ये चढतांना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून लंपास करण्यात आले आहे.याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
       पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, कांगणेवाडी ता.आंबाजोगाई जि. बीड. येथील 65 वर्षीय फिर्यादी रुक्मीणबाई बालासाहेब कांगणे या दि. 21/10/2024 रोजी दुपारी 2.00 वा सुमारास परळी बसस्थानक येथे परळी - धर्मापुरी बस मध्ये चढत असतांना अज्ञात आरोपीने या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून लंपास केले आहे.त्या परळी वै. बस स्थानक येथुन धर्मापुरी कडे जाण्यासाठी परळी - धर्मापुरी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या गळ्यातील 9½ ग्रॅम वजनाचे जुने वापरते सोन्याचे मनी मंगळसुत्र  (एकुण किंमत अंदाजे 65,000/ रुपये)  अज्ञात चोरट्यांने तोडुन काढुन चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुरन 176/2024 कलम 303 (2) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह समाधान भाजीभाकरे हे करीत आहेत.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या