पोस्ट्स

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

इमेज
भाजपात पंकजा मुंडेंसारख्या दिग्गजांना बेदखल केले जाते तर सामान्यांची काय गत - राजेश देशमुख भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा; पत्रकार परिषदेत घोषणा परळी (प्रतिनिधी)       मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने आता या पक्षाचा आणि माझा कसलाही संबंध उरलेला नाही. इथल्या नागरिकांच्या आशा आणि अपेक्षा सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचा आम्ही पूर्णतः अभ्यास केल्याने मध्यंतरीच्या काळात शरदचंद्र पवार यांच्याकडे आम्ही उमेदवारी मागण्यांसाठी भेटलो आहोत. इथल्या संपूर्ण परिस्थितीची त्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ सोबत घेऊन आम्ही मुंबई येथे त्यांची भेट घेतली. मागील काळात पंकजाताई यांच्यासोबत आम्ही काम करण्याचं ठरवल होत मात्र आता बीड जिल्ह्यात हा पक्ष शिल्लक राहतो की नाही अशी अवस्था आहे. जिथे पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना त्या पक्षात नजरांदाज केले जाते तर आमच्या भवितव्याचा इथे विचार केला जाणार नाही असे वाटल्याने आता आम्ही ज्या मूळ पुरोगामी विचारांच्या पक्षात काम करत होतो तिथेच परत येऊन काम करण्याचे मी ठरवले असल्याचे ज्येष्ठ

निष्ठा सरस ठरली: शरद पवारांनी दिली पून्हा "भैय्यांनाच" संधी

इमेज
  निष्ठा सरस ठरली: विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच तिकीट बीड: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे . गेल्या काही दिवसापासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे कुणाला उमेदवारी देतात याबाबत उत्सुकता ताणली गेली होती ,त्यातच राष्ट्रवादी पक्षाने बोलावलेल्या इच्छुकांच्या बैठकीस संदीप क्षीरसागर हे उपस्थित राहू शकले नव्हते ,मात्र नंतर त्यांनी स्वतंत्रपणे पवारांची भेट घेतली होती .राष्ट्रवादीकडून ज्योतीताई मेटे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेही इच्छुक होते पण पुन्हा एकदा शरद पवार यांनी तरुण आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड विधानसभा मतदारसंघ लढवण्याची आणि तो जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीचे महाआघाडी कडून स्वागत करण्यात आले आहे.

बीड भाजप नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

इमेज
शंकर देशमुख भाजपचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष     भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.       भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.दोन पिढ्यापासून पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख कुटुंबाला न्याय दिला आहे. भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची कार्यकारी  जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाला हबाडा: रमेश आडसकरांनी वाजवली तुतारी !

इमेज
भाजपाला हबाडा: रमेश आडसकरांनी वाजवली तुतारी ! धारूर, प्रतिनिधी....  माजलगाव  मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर शरद पवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष होते. आज ही प्रतिक्षा संपली असून भाजप नेते रमेश आडसकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षात प्रवेश केला. यामुळे आता माजलगावमधून निवडणूक रिंगणात रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.          राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती- महाआघाडी पक्षातील फूट या नवीन समीकरणामुळे बंडखोरी, पक्षांतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांकडून माजलगाव मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु होती. माजलगाव मतदारसंघासाठी भाजपाचे मोहन जगताप व रमेश आडसकर यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनाच पुन्हा उमेदवारी देवून अजित पवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे. यामुळे आता तुतारी कोण वाजविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दि.25 शुक्रवारी रमेश आडसकर यांनी मुंबई येथे शरद पवार यांची त्यांच्या सिल

MB NEWS: अग्रलेख >>>>नवे संस्थानिक.. नवे सुभेदार...त्या-त्या वतनाचे आम्हीच वतनदार !

इमेज
  नवे संस्थानिक.. नवे सुभेदार...त्या-त्या वतनाचे आम्हीच वतनदार !         स ध्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरु आहे.सर्वच पक्ष आपापले उमेदवार निवडत आहेत.एकंदरीत उमेदवारी देतांना काही राजकीय कुटुंबातील सर्वच सदस्य सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.जणू काही या राजकीय कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त एकही कार्यकर्ता त्या लायकी नसतो.प्रमुख नेते,खासदार-आमदार पुत्र, बायको, पुतण्या,मुलगी, जावई, भाऊ नसेलच तर अगदी नात्यातील जवळचा नातलग हेच आमदारकीसाठी लायक आहेत  बाकीच्यांचा हा प्रांतच नाही असे काहीसे चित्र सर्वच पक्षांतून दिसुन येत आहे. आज घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही. नवे सुभेदार, नवे संस्थानिक जन्माला आले आहेत.  महाराष्ट्राचे राजकारण हे काही मोजक्या कुटुंबांभोवती फिरत असल्याचेच दिसते. ‘घराणेशाही’ या शब्दात अनेक गíभतार्थ दडलेले आहेत. त्यात नकारात्मक अर्थ अधिक आहे. ‘राजकीय कुटुंब’ असा घराणेशाहीला शोभणारा सौम्य अर्थही त्यात आहे.      या घराणेशाहीचे केवळ राजकीयच नव्हे, तर अनेक सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.आपल्या राजकारणाचा प्रवास लोकशाही  या गोंडस नावाखाली सुरू अस

परळीत कुत्रे पिसाळले !

इमेज
  परळीत कुत्रे पिसाळले: 23 जणांना घेतला चावा ; नागरीकांनी काळजी घ्यावी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या दोन तासांमध्ये सुमारे 23 जणांचा सहावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. आज गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान चावा घेतलेल्या नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकच गर्दी केली होती.        गुरुवार दिनांक 24 ऑक्चटोबर रोजी सांयकाळी 6.30 वाजल्याचे नंतर नेहरू चौक (तळ), पंचवटी नगर, वैद्यनाथ मंदिर परिसर आणि विविध भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. समोर येईल त्याला आणि पुढे चालणाऱ्याला पाठीमागून चावा घेत अवघ्या दीड दोन तासांत 23 लोकांना जखमी केले चावा घेतलेल्या नागरिकांनी परळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी धाव घेतली.  तेथे रुग्णांना इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आले. दरम्यान अवघ्या काही वेळामध्येच रुग्णालयामध्ये अक्षरशः कुत्रा चावलेल्या नागरिकांची गर्दी झाली होती.      पिसाळलेला कुत्रा परिसरामध्ये धुमाकूळ घालत असून 23 चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे

वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी

इमेज
वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नव्याने प्रवेश केलेले गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना वंचित बहुजन आघाडीने गंगाखेड मधून उमेदवारी घोषित केले आहे. तर पाथरी मतदारसंघातील उमेदवारी बदलून या ठिकाणी नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.