इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

निष्ठा सरस ठरली: शरद पवारांनी दिली पून्हा "भैय्यांनाच" संधी

 निष्ठा सरस ठरली:विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच तिकीट


बीड:प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे .

गेल्या काही दिवसापासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे कुणाला उमेदवारी देतात याबाबत उत्सुकता ताणली गेली होती ,त्यातच राष्ट्रवादी पक्षाने बोलावलेल्या इच्छुकांच्या बैठकीस संदीप क्षीरसागर हे उपस्थित राहू शकले नव्हते ,मात्र नंतर त्यांनी स्वतंत्रपणे पवारांची भेट घेतली होती .राष्ट्रवादीकडून ज्योतीताई मेटे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेही इच्छुक होते पण पुन्हा एकदा शरद पवार यांनी तरुण आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड विधानसभा मतदारसंघ लढवण्याची आणि तो जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीचे महाआघाडी कडून स्वागत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या