पोस्ट्स

बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

इमेज
  नवे एसपी  नवनीत कॉवत यांनी रात्री पावणे अकरा वाजता स्वीकारला पदभार  बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान  बीड, एमबी न्यूज वृत्तसेवा : बीडच्या मसाजोग येथील संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणाच्या तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली होती.त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त नवनीत कॉवत यांची नियुक्ती झाल्याचे आदेश दुपारी प्राप्त झाले होते.       यानंतर कॉवत यांनी तातडीने बीडमध्ये दाखल होत रात्री पावने अकरा  वाजता बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.  बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान कॉवत यांच्यासमोर असून ते हे कशा पद्धतीने पेलतात याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे.टॉपर आयपीएस अधिकारी असलेले नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक राहणार असून ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते.आता बीड मधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचे आवाहन...

संपूर्ण यादी - मंत्रिमंडळ खातेवाटप

इमेज
  अखेर खातेवाटप झालं : बघा - कोणाला मिळालं कोणतं खातं ? ना.धनंजय मुंडे यांचेकडे अन्न व नागरी पुरवठा तर पंकजा मुंडे पर्यावरण विभागाची जबाबदारी बीड, प्रतिनिधी.. बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहिण-भावाचा राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणती खाती दिली जातात याची उत्सुकता होती ती आता संपुष्टात आली आहे. मंत्रीमंडळात ना.धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा तर ना. पंकजा मुंडे यांच्या कडे पर्यावरण विभाग, पशुसंवर्धन चा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवला आहे. राज्य मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पर्यावरण मंत्री या दोन्ही महत्वपूर्ण विभागाचा कार्यभार आता मुंडे बहिण भाऊ स्वतंत्र पुणे सांभाळणार आहेत. आता उत्सुकता आहे ती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कार्यभार कोणाकडे जातो याची. कॅबिनेट मंत्री 1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) 3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण 4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री 5.गिरीश महाजन - ...

संतोष देशमुख खून प्रकरणात अविनाश बारगळ यांची झाली होती बदली

इमेज
  टॉपर आयपीएस अधिकारी  नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक संतोष देशमुख खून प्रकरणात अविनाश बारगळ यांची झाली होती बदली बीड,  एमबी न्यूज वृत्तसेवा: संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासात कुचराई केल्याच्या ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतरबीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे. टॉपर आयपीएस अधिकारी असलेले  नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक  असणार आहेत. नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक राहणार असून ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते.आता बीड मधील कायदा सुव्यवस्था  सुरळीत करण्याचे आवाहन..कावत यांच्यासमोर आहे . काँवत हे 2017 सालच्या बँचचे टॉपर आयपीएस अधिकारी आहेत .अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. स...
इमेज
  श्रीमती सागरबाई सोळंके यांचे निधन ;प्रकाश सोळंके यांना मातृशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील तुळजाजाई नगरमधील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश शंकरराव सोळंके यांच्या मातोश्री श्रीमती सागरबाई सोळंके यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते.      वडगाव दादाहरी येथील हॉटेल रायगडचे मालक प्रकाश सोळंके यांच्या मातोश्री श्रीमती सागरबाई सोळंके यांचे आज शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या अतिशय धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आजच सायंकाळी धारूर तालुक्यातील मौजे आमला या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.       कै. सागरबाई सोळंके यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. सोळंके परिवाराच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.  उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम      दरम्यान कै. सागरबाई सोळंके यांच्या राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या रविवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता आमला येथे होणार आहे.
इमेज
  गौरव मल यांना पितृशोक; गिरधारीलाल मल यांचे निधन परळी/ प्रतिनिधी- विवेकानंद नगर येथील रहिवासी गौरव आणि मनोज मल यांचे वडील गिरधरीलाल मल यांचे आज (दि.२०) सकाळी औरंगाबाद येथे उपचार घेत असताना  निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे  वय 70 वर्षे होते. स्व. गिरधरलालज मल यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, चार बहिणी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.        स्व. गिरधरलाल मल ह्यांचा धार्मिक कार्यात विशेष सहभाग होता. संयमी आणि शांत वृत्तीचे म्हणून ते सर्व परिचित होते. मल परिवारावर पडलेल्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. अंत्यसंस्कार दरम्यान, आज शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी  परळीतील राजस्थानी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सकाळी 10 वा. त्याचे राहते घर स्वामी विवेकानंद नगर येथून अंत्ययात्रा निघेल.
इमेज
 न.प. परळी वैजनाथ: जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण व शासकीय कामात अडथळा आणला; माजी नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी नगर परिषद कार्यालयात घरकुल विभागातील एक करमचारी शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. या कर्मचाऱ्यांस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद या न प कर्मचाऱ्याने दिली असुन याप्रकरणी तीन जण व अन्य अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, न प कर्मचारी फिर्यादी सिद्धार्थ भारत गायकवाड वय 30 वर्ष, व्यवसाय- नौकरी (MIS स्पेशालीस्ट) नगर परीषद परळी हे शासकीय कामकाज करित असताना यातील आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीस कामकाजा बाबत विचारणा केली व जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच हाताबुक्काने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन आरोपी- 1) अन्वर मीश्कीन शेख 2) शेख अजीज इस्माईल 3) शहबाज सज्जाद बेग व इतर अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुरन - 194/2024 कलम 132,121 (1), 352, 351 (2),351(3),...

मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर !

इमेज
  मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण: बीडच्या एसपींची तडकाफडकी बदली ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     मस्साजोग प्रकरणात एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून विधिमंडळ अधिवेशनात हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाची कामकाजाची पद्धत यावरही प्रचंड प्रमाणात टीका झाली. बीडचे बिहार झाल्याच्या टीका विरोधकांनी केल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर आज सभागृहात सविस्तर उत्तर दिले. या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, कोणीही असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर या घटनेतील दोषी पोलीस अधिकारी,  कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही कारवाया केलेल्या आहेत. याचअनुषंगाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचीही तडकाफडकी बदली करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहा...