इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

 नवे एसपी नवनीत कॉवत यांनी रात्री पावणे अकरा वाजता स्वीकारला पदभार 


बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान 

बीड, एमबी न्यूज वृत्तसेवा : बीडच्या मसाजोग येथील संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणाच्या तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली होती.त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त नवनीत कॉवत यांची नियुक्ती झाल्याचे आदेश दुपारी प्राप्त झाले होते. 

     यानंतर कॉवत यांनी तातडीने बीडमध्ये दाखल होत रात्री पावने अकरा  वाजता बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.  बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान कॉवत यांच्यासमोर असून ते हे कशा पद्धतीने पेलतात याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे.टॉपर आयपीएस अधिकारी असलेले नवनीत कॉंवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.

नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक राहणार असून ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते.आता बीड मधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचे आवाहन..कावत यांच्यासमोर आहे .काँवत हे 2017 सालच्या बँचचे टॉपर आयपीएस अधिकारी आहेत .अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या