वाल्मीक कराड केज न्यायालयात !

वाल्मीक कराड केज न्यायालयात ! केज:- खंडणी प्रकरणातील सी आय डी च्या कोठडीत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला केज न्यायालयात हजर केले आहे. दिनांक.१४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वा. च्या सुमारास खंडणी प्रकरणी सी आय डी च्या कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराड याला केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहे. न्यायालयामध्ये घेऊन जात असताना पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद केलेली होती. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड पोलीस बंदोबस्त असून या ठिकाणी आत मध्ये कोणालाही सोडले जात नाही. सर्व माध्यमांचे प्रतिनिधी देखील प्रवेशद्वारा समोर उभे आहेत.