इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

सरकारचा मोठा निर्णय.....

 मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; जुनी एसआयटी बरखास्त !

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात"जूनी एसआयटी बरखास्त करून नवीनची स्थापना केली आहे. यामध्ये आता नऊ ऐवजी सहा जणांचा समावेश आहे. उप महानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख कायम राहणार आहेत.

 १ जानेवारीला उप महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. यात बीड जिल्ह्यातीलच अधिकारी, कर्मचारी घेण्यात आले होते. तेली यांनी तपासाला सुरूवात करत आरोपींची चौकशीही केली होती.

नव्या एसआयटीत कोण?

किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)

अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)


जुन्या पथकात कोण होते?


अनिल गुजर - पोलीस उपअधीक्षक, सीआयडी बीड

विजयसिंग शिवलाल जोनवाल स.पो. निरीक्षक, एलसीबी बीड

महेश विघ्ने - पोलिस उपनिरीक्षक, एलसीबी बीड

आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक, केज

तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक, एलसीबी बीड

मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार, एलसीबी बीड

चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक, केज

बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक, केज

संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई, केज"


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या