इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

इतर सणांप्रमाणेच मकर संक्रांतीलाही परळीतील महावितरणाचा ठरलेला नेहमीचा 'दांडी'या सुरुच !

सणासुदीत विजेचा अखंडित खोळंबा:नागरिकांतील संतापाच्या भावनांची कोणीतरी दखल घ्यावी!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

         सध्या मकरसंक्रांत सणाची धामधूम सुरु आहे. शहरात विविध ठिकाणी महिलावर्गाची लगबग सुरु आहे. येणाऱ्या आठवडाभरात महिलांकडून हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र इतर सणांप्रमाणेच यावेळीही परळीतील महावितरणाचा ठरलेला नेहमीचा 'दांडी'या सुरुच आहे.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही ऐन सणासुदीच्या काळात शहरात रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

     महिलांचा महत्त्वाचा मकरसंक्रांत उत्सव सुरु आहे.यावेळी शहरातील नागरिक, महिला, युवक, युवती यांची सणाची लगबग सुरु आहे. येत्या काही दिवसांत रात्री उशिरापर्यंत महिला मंडळाची हळदी कुंकवासाठी रस्त्यावर मोठी वर्दळ व गर्दी राहणार आहे. मात्र  नेमक्या या धामधुमीत वीजवितरण कंपनीने मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपली परंपरा सुरू ठेवली असून जसाही मकरसंक्रांतीचा माहोल सुरू झाला आहे तसे विजेचा लपंडावही सुरू झाला आहे.

     शहरातील पद्मावती गल्लीसह विविध भागातील वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा. याठिकाणी असलेल्या त्रुटी दूर कराव्यात; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वीजवितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट