इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

परळीत श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायणाची ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता

कोष्टी समाजाचा उपक्रम; शिस्तबध्द ग्रंथदिंडीने परळीकरांचे लक्ष वेधले!                                       

परळी (प्रतिनिधी)

होमहवण, ग्रंथदिंडी, प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे संगमकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायणाची सांगता मोठ्या थाटा- माटात पार पडला. कोष्टी समाजाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांचा परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या ग्रंथदिंडीकडे परळीकरांचे लक्ष वेधले. श्री रामलिंग चौंडेश्वरी मातेचा व रामकुष्ण हरी च्या जयघोषाने परळी नगरी दणाणली होती. टाळ- मृदंगाने सर्वजण मंञमुग्ध झाले होते. 


यावेळी बोलतांना प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे संगमकर यांनी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे नेघे माझी वाच्या तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांचीया भाव तुका म्हणे पापे जाती संताचीय जपे या अभंगावर  चिंतन करतांना शाकंबरी चौंडेश्वरी देवी चे महत्व सांगून पुढे म्हणाल्या की, चौडेश्वरी देवी यांचे चामुंडा देवी शाकंबरी देवी असे एकूण 52 शक्ती पीठ आहेत. चौडेश्वरी देवी ने दुष्काळात आपल्या शरीरात शांकभाजी निर्माण करून भक्तांना तारले म्हणून तिला शंकभरी असेही म्हणतात. तसेच तीर्थक्षेत्र बदामी येथे बनाच्या रम्य परिसरात स्थायिक झाल्यामुळे बनशंकरी असेही संबोधतात. या देवीचे अखिल भारतातील देवांग हटगर कोष्टी समाजाची श्री बनशंकरी देवी ही कुलदैवत मानली जाते असेही त्या म्हणाल्या.

शहरातील गुरूकृपानगर येथील श्री हनुमान मंदिर येथे  दिनांक 7 जानेवारीपासून सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायणची मान्यवरांच्या उपस्थीतीत ग्रथंपुजा करून प्रारंभ करण्यात आला होता. पारायण दररोज सकाळी 7 ते 10  यावेळेत होत होते. या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थीती लाभत होती. पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सौ. शितल साबणे या होत्या. 

या सप्ताहाची सांगता दि.13 जानेवारी 2024 रोजी सकाळी होमहवण , 10 ते 12 ग्रंथदिंडी, दुपारी 12 ते 2 प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ. प.जनाई महाराज कोकाटे यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. किर्तनाचा व महाप्रसादाचा हजारों भाविकांनी लाभ घेतला.

पालखी व ग्रंथदिंडीचे विविध ठिकाणी स्वागत

        सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी काढण्यात आलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीच्या प्रतिमेची पालखी व ग्रंथदिंडीचे विविध ठिकाणी रांगोळीची आरास व पुजा करून भाविकांनी दर्शन घेतले. टाळ- मृदंग, रामलिंग चौंडेश्वरी देवीचा जयघोष, रामकुष्ण हरिचा गजर, फुगडया, भजन याकडे परळीकरांचे लक्ष वेधले. या भक्तीमय वातावरणात अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या सहभागामुळे आणखीन रंगत आली होती. उपस्थित ह .भ. प. गायनाचार्य भरत महाराज सोडगीर मृदंगाच्या बाळू महाराज , गायनाचार्य अश्विनीताई बडे व गुरुकृपा नगर मधील महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाला साथ संगत केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट