पोस्ट्स

इमेज
परळी ते नंदागोळ रोडवरील अनंतनगर येथे श्री अनंतेश्वर महादेव व श्री सद्‌गुरु दत्तात्रय महाराज प्राण प्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            परळी ते नंदागोळ रोडवरील अनंतनगर येथे आज दि.१७ व १८ रोजी श्री अनंतेश्वर महादेव व श्री सद्‌गुरु दत्तात्रय महाराज प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.     परळी ते नंदागोळ रोडवरील अनंतनगर येथे श्री अनंतेश्वर महादेव व श्री सद्‌गुरु दत्तात्रय महाराज प्राण प्रतिष्ठा सोहळा मित्ती माघ कृ.५ शके १९४६ सोमवार दि. १७/०२/२०२५ रोजी या शुभमुहूर्तावर होणार आहे. त्यानिमित्त मंगळवार दि. १८/०२/२०२५ रोजी दुपारी १२ ते ४ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  राजाभाऊ दिगांबरराव जबदे, चंद्रकांत दिगांबरराव जबदे, लक्ष्मीकांत दिगांबरराव जबदे, विक्रांत उल्हासराव जबदे, प्रा.डॉ. श्री. प्रदिप विष्णुपंतराव जबदे, मनोज अनंतरा...

माजलगाव न्यायालयाचा आदेश

इमेज
  लघु सिंचन प्रकल्पाचा मावेजा अडवून ठेवला :बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त  माजलगाव न्यायालयाचा आदेश बीड  : वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता . मात्र 1998 पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. त्यामुळे तीन शेतकरी हातबल झाले होते. शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने सर्व प्रकार समजून घेत चक्क जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्तीचे आदेश दिले.      माजलगाव कोर्टाने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वाहनाच्या जप्तीच्या आदेश काढल्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयातून सदर गाडी जप्त करण्यात आली आहे.          चिखल बीड तालुका वडवणी येथील शेतकऱ्यास तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा न दिल्याने कोर्टाने  जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करून माजलगाव न्यायालयात जमा केली आहे.वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे या शेतकऱ्यांची जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने संपादित केली होती व या जमिनीचा अ...

खोटे आरोप आणि वस्तुस्थिती नेमकं काय?

इमेज
  IFFCO ने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून त्यांची उत्पादने विक्री करण्यास याआधीच घातलेली आहे बंदी अंजली दमानिया यांनी नॅनो खतांच्या ऑनलाईन खरेदीवरून केलेले खोटे आरोप आणि वस्तुस्थिती मुंबई (प्रतिनिधी) - जागतिक स्तरावर सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था IFFCO ने याआधीच लेखी स्वरूपात स्पष्ट केलेले आहे की कोणत्याही ई - कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCO ची उत्पादने विकण्याचा अधिकार नाही.  अनधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून खरेदी करण्यात येणारी IFFCO ची उत्पादने ही संपूर्णतः खरेदीदारांच्या जबाबदारीवर आहेत. सदर प्लॅटफॉर्म गैरवाजवी किंमतीत ही उत्पादने अनधिकृतरित्या विकतात. ऑनलाईन खतविक्री बाबतच्या केंद्र सरकारच्या नियमानुसार '' एफ सी ओ " परवाना किंवा IFFCO कडून अनिवार्य असलेला 'ओ फॉर्म' नसलेल्या कोणत्याही संस्थेस उत्पादने विक्री करण्यास मनाई घातलेली असून असे केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार IFFCO ने राखून ठेवलेला आहे. याबाबत IFFCO ने वेळोवेळी प्रेस नोट काढून माध्यमांना देखील माहिती दिलेली आहे.  IFFCO कंपनीच्या सर्व उत्पादनांची विक्री किंमत ही संपूर्ण देशात सारखीच आहे. मा...
इमेज
पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात इ.१०वी वर्गाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात    अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :-  पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या इ.१०वी वर्गाचा 'शुभेच्छा समारंभ' दि.१७ फेब्रुवारी २०२५ सोमवार रोजी उत्साहात संपन्न झाला.   याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  संजयराव विभूते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून १०वी प्रमुख  विष्णू तेलंगे उपस्थित होते.   सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.   याप्रसंगी विद्यार्थी मनोगतात इ.१०वीतील कु.सुप्रिया साळवे,अक्षता थोरात,अक्षता साळुंके,प्रिया वाघमारे,प्रीती सोळंके,निशिगंधा निकम,चि. विश्वजित निकम,सलमान शेख,साजिद शेख,गजानन पांचाळ,प्रणव वाघमारे,ओमकार कल्याणी यांनी विद्यार्थी जीवनातील एक टप्पा पूर्ण केल्याचा आनंद आणि या काळातील विविध क्षणांना पारखं झालो याचे दुःख व्यक्त केले.तसेच कु.वैष्णवी गुळवे हिने सादर केलेल्या 'का कळेना अशी हरवली पाखरे' या गीताने सर्वांना याप्रसंगी ...
इमेज
  ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन     अंबाजोगाई (वसुदेव शिंदे). ..समस्त ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.  समस्त ब्राम्हण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यलय अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे वाचन शैलेश कुलकर्णी यांनी केले या वेळी संजय देशपांडे, अनिरुध्द चौसळकर,पडमनाभ देशपांडे, अभय जोशी,डॉ दिलीप कुलकर्णी, भास्कर देशपांडे,मिलिंद कुलकर्णी, विवेक वालेकर, ॲड स्वानंद कन्नडकर,सुभाष देशपांडे आणि मोठ्या प्रमाणात समस्त ब्रह्मवृंद उपस्थित होते. मागण्या   परशूराम महामंडळासाठी पाचशे कोटींची तरतूद करणे.   प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन नावाने ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधून देने.  ब्राह्मण समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षण मोफत करावे .  श्रीवर्धन येथील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारकाचे नुतनीकरण करणे.  सिबीएससी स्टेट बोर्ड यांच्या पुस्तकात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर आधारित धडा समाविष्ठ...
इमेज
  पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्या डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई ची मागणी अंबाजोगाई :-(वसुदेव शिंदे);- अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार भवन व्हावे सातत्याने मागणी होत असताना अद्याप लोकप्रतिनिधी यांच्याकडून पत्रकार भवना च्या मागणीची दखल घेण्यात आली नाही परंतु अंबाजोगाई चे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी नगरपरिषद येथे तात्पुरता स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय शेजारी पत्रकार कक्ष तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे परंतु ज्या ठिकाणी पत्रकार पक्ष देण्यात आला ती इमारत जुनी आहे कोणत्याही क्षणी ती इमारत जमीनोदोस्त केली जाणार आहे त्यामुळे अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीस माजी पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी पुढाकार घेऊन पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे या जागेमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे त्यामध्ये अंबाजोगाई पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशम...

ग्रामदैवत भामेश्वर मंदिर येथे आयोजन

इमेज
महाशिवरात्री व संताजी महाराज  पुण्यतिथी निमित शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सव ग्रामदैवत  भामेश्वर मंदिर येथे आयोजन   पाटोदा/ अमोल जोशी.      दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्री व संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त शहराचे ग्रामदैवत भामेश्र्वर मंदिर येथे शिव  महापुराण कथा  व कीर्तन महोत्सवाचे आयोजन गुरुवार 20 फेब्रुवारी ते शुक्रवार 28 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे.              छत्रपती संभाजीनगर येथील कथाकार संगीताताई पूर्णे ह्या शिव महापुराण कथेचे निरूपण करणार आहेत दररोज सायंकाळी 8 ते 10 या वेळेत ही कथा भामेश्वर मंदिर येथे होईल. तसेच दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी  मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती राधाताई महाराज यांचे रात्री 9 ते 11 कीर्तन होईल व दिनांक 27 फेब्रुवारी रात्री 8 ते 10 या वेळेत ह.भ.प. संगीताताई पुर्णे यांचे कीर्तन होणार आहे  शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून श्री. शंभू महादेव व श्री संत संताजी महा...