गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

परळी ते नंदागोळ रोडवरील अनंतनगर येथे श्री अनंतेश्वर महादेव व श्री सद्‌गुरु दत्तात्रय महाराज प्राण प्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
           परळी ते नंदागोळ रोडवरील अनंतनगर येथे आज दि.१७ व १८ रोजी श्री अनंतेश्वर महादेव व श्री सद्‌गुरु दत्तात्रय महाराज प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

    परळी ते नंदागोळ रोडवरील अनंतनगर येथे श्री अनंतेश्वर महादेव व श्री सद्‌गुरु दत्तात्रय महाराज प्राण प्रतिष्ठा सोहळा मित्ती माघ कृ.५ शके १९४६ सोमवार दि. १७/०२/२०२५ रोजी या शुभमुहूर्तावर होणार आहे. त्यानिमित्त मंगळवार दि. १८/०२/२०२५ रोजी दुपारी १२ ते ४ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  राजाभाऊ दिगांबरराव जबदे, चंद्रकांत दिगांबरराव जबदे, लक्ष्मीकांत दिगांबरराव जबदे, विक्रांत उल्हासराव जबदे, प्रा.डॉ. श्री. प्रदिप विष्णुपंतराव जबदे, मनोज अनंतराव जबदे,दत्तात्रय विनायकराव जबदे,अतुल राजाभाऊ जबदे चि. अर्थव, प्रथमेश, शिवप्रताप, युग व समस्त जबदे परिवार त्याचबरोबर सुमितराव सुधाकरराव जोशी, नागेश रमाकांतराव जोशी,व्यंकटेश सुनिल जोशी,चि. यश उर्फ विश्वनाथ सर्वज्ञ जबदे,चि. श्रीनिवास सुमितराव जोशी आदींनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या