
आद्य वचनकार लिंगायत हटगर कोष्टी समाज कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांची १०४६ वी जयंती उत्साहात साजरी अंबाजोगाई/प्रतिनिधी आद्य वचनकार लिंगायत हटगर कोष्टी समाज कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांची १०४६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. हा भव्य सोहळा श्री रामलिंग चौंडेश्वरी व नवनाथ महाराज मंदिर (गढीवर), कोष्टी गल्ली, अंबाजोगाई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माता चौंडेश्वरी देवी व आद्य वचनकार लिंगायत हटगर कोष्टी समाज कुलगुरू श्री श्री श्री देवरदासी मैया यांची सौ. सीमा प्रदीप वरवटकर महिलाअध्यक्ष महाराष्ट्र राज्य लिंगायत हडगार कोष्टी समाज संस्था महाराष्ट्र राज्य, शाखा अंबाजोगाई यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. या पावन सोहळ्यात समाजातील असंख्य बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या श्रद्धेचा आणि एकात्मतेचा ठेवा जपला. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री देवरदासी मैया यांच्या विचारांचा आणि शिकवणीचा महिमा उलगडण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी समाज एकता, आध्यात्मिक विचारधारा आणि संस्कृतीच्या जतनाचे महत...