परळीच्या पत्रकाराचा सन्मान

 जिजाऊंच्या वास्तवाने पावन झालेल्या भूमीमध्ये परळीच्या पत्रकाराचा सन्मान 

ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांना वास्तववादी लिखाणासाठी पुरस्कार प्रदान 

परळी/प्रतिनिधी  - सिंदखेड राजा हे परगणा लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासाठी प्रसिद्ध आहे. हा राजवाडा सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव यांनी बांधला होता . जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी याच ठिकाणी झाला.

ख्यातनाम बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील राजे लखुजी जाधव साहित्य नगरी, येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात परळी येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांना त्यांच्या वास्तववादी व सामाजिक लिखाणा बद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला,

राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळावर प्रांत तथा जिल्ह्यातून आवर्जून उपस्थित झालेल्या साहित्यिक, कवी,आणि लेखक व रसिक माता भगिनींना सर्व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.  

या साहित्य संमेलनात आपल्या वैविध्यपूर्ण लेखनाने वास्तववादी विषय मांडून सामाजिक जागृती करणारे परळी येथील जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांना त्यांच्या लिखाणाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून विविध साहित्यिक, लेखक, पत्रकार यांनी त्यांना फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !