इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

अद्वैत राजेंद्र डुबे एमबीबीएस उत्तीर्ण


परळी (प्रतिनिधी)

 परळी येथील प्रसिध्द व्यापारी राजेंद्र डुबे यांचा मुलगा अद्वैत डुबे हा वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस परिक्षा उत्तीर्ण झाला असुन याबद्दल त्याचा पायोनियर डिस्टीब्युटर्सच्या कर्मचार्यांनी सत्कार केला.

 परळी येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे पुतणे पायोनियर डिस्टीब्युटर्सचे संचालक राजेंद्र डुबे व पत्नी सौ.सविता राजेंद्र डुबे यांनी पायोनियर डिस्टीब्युटर्स घ्या माध्यमातून परळीच्या औषधी क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देत आपल्या मुलाला शैक्षणिक क्षेत्रात घडवले.चिरंजीव अद्वैत याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परळी येथील भेल सेकंडरी स्कुल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शाहु कॉलेज लातुर येथे झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवीसाठी त्याची केईएम मेडिकल कॉलेज मुंबई येथे निवड झाली.याचा नुकताच निकाल लागला असुन यात तो उत्तीर्ण झाला.एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर चि.अद्वैत परळी येथे आल्यानंतर त्याचा आई वडिलांसह पायोनियर डिस्टीब्युटर्सचे कर्मचारी वैभव कुरकुट,आकाश शेळके,कृष्णा भारती,अनंत जमशेटे संकेत शेलार,अशोक मोरे,राजू शहाणे,सचिन कुंभार आदींनी सत्कार करत पुढील वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या