इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

मराठी शाळेतूनच संस्कारक्षम माणसे घडतात-पंकजा मुंडे

 जालन्यातील गावागावात ना. पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत!

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या आश्रमशाळेच्या वस्तीगृह इमारतीचे ना. पंकजा मुंडेंच्या हस्ते थाटात भूमिपूजन

जालना ।दिनांक ०२।

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या आन्वी येथील संत भगवान बाबा आश्रमशाळेच्या वस्तीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मोठया थाटात झाले. 


    आन्वी (ता. बदनापूर) येथील पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेच्या संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या नवीन वस्तीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन आज राज्यपाल बागडे व ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी  नियोजित कार्यक्रमाकडे जात असताना रस्त्यात अकोला (निकळक), आन्वी तसेच गावोगावी ग्रामस्थांनी रस्त्यात वाहनाचा ताफा थांबवून जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत ना. पंकजाताई व राज्यपाल बागडे यांचे वाजतगाजत जोरदार स्वागत केले. यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत भगवान बाबा आश्रमशाळेत संस्थेच्या वतीने ना. पंकजाताईंचे स्वागत करण्यात आले.

ना. पंकजा मुंडे नेमकं काय बोलल्या?

----------

शिक्षक हे आपल्या जीवनात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात. गुरु कधीही मुलांवर वाईट संस्कार करत नाहीत. योग्य ती दिशा  दाखविण्याचे कार्य हे गुरुवर असते. तर दाखविलेल्या योग्य वाटेवर चालण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. आणि स्वत:च्या मनावर ताबा ठेवत, जो संस्कार ग्रहण करतो तोच जीवनात यशस्वी होत असतो. तथापि मराठी शाळेतूनच संस्कारक्षम माणसे निपजली जातात, असं  जिल्ह्याच्या  पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. 

    मराठी शाळेत संस्कारक्षम पिढी घडविण्याची सक्षमता आहे. जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी, मंत्री पदापर्यंत झेप घेतलेल्या व्यक्तींचे शिक्षण हे मराठी शाळेमधूनच झाल्याचे आपल्याला दिसून येईल.  संघर्षामधूनच इतिहास घडत असतो, त्यामुळे शॉर्टकट वापरुन पुढे जाण्याचा विचारसुध्दा मनात येवू देवू नका. मैदानी खेळ खेळा, शिक्षण घ्या आणि आपले जीवन यशस्वी करा असेही त्यांनी सांगितले. आज गावच्या गावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत, या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याचे काम शासनाने केले आहे असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमास ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....